वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला पोलिस ठाणे हद्दीत विशेष महिमेंतर्गत मानसिश्वर नाका, शिरोडा बायपास, घोडेमुख नाका या ठिकाणी सलग दोन दिवस वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे पोलिस निरिक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या नाकाबंदी मोहिमेत अवजड वाहनांवर एकूण ८ कारवाई तर अन्य १०७ वाहनांवर पोलिसांनी ५१,३०० एवढी दंडात्मक कारवाई केली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राजसिंग-डुंगरपूर-चषक/
वाहतुक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांवर केलेल्या कारवाईच्या धडक मोहिमेत वेंगुर्ला पोलिस निरिक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक शेखर दाभोलकर, तुकाराम जाधव, पलिस कर्मचारी सुरेश पाटील, बंटी सावंत, बंड्या धुरी, वाहतुक पोलिस मनोज परुळेकर, पांडुरंग खडपकर, महिला पोलिस पूजा भाटये, राहूल बर्गे, दादा परब आदी सहभागी झाले होते.



[…] […]