Kokan: बारसूमध्ये रिफायनरी झाली तर माझी जमीन जाणार नाही; शरद पवारांचं मोठं विधान

0
57
बारसूमध्ये रिफायनरी झाली तर माझी जमीन जाणार नाही; शरद पवारांचं मोठं विधान
बारसूमध्ये रिफायनरी झाली तर माझी जमीन जाणार नाही; शरद पवारांचं मोठं विधान

🔷 बारसूमध्ये होत असलेल्या रिफायनरीला माझा विरोध किंवा पाठिंबा असण्याचं कारण नाही

🔷 उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चेनंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली पवार यांची पत्रकार परिषद


रत्नागिरी: रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू इथं प्रस्तावित असलेल्या रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध होत आहे. सरकार रिफायनरीवर ठाम आहे तर विरोधक आंदोलनावर ठाम आहेत. या प्रकरणी चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी यावेळी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. https://sindhudurgsamachar.in/kokan-रिफायनरी-प्रकल्पाला-नवा/

उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. ‘बारसूमध्ये होत असलेल्या रिफायनरीला माझा विरोध किंवा पाठिंबा असण्याचं कारण नाही. तिथं माझी जमीन जाणार नाही किंवा रिफायनरी झाली तर मला नोकरी मिळणार नाही. मुळात माझं मत तिथं महत्त्वाचं नाही. स्थानिक लोकांना काय वाटतं ते महत्त्वाचं आहे, असं शरद पवार म्हणाले.

‘एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात होत असताना त्यात स्थानिकांना विश्वासात घेतलं पाहिजे. त्याला विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न व्हायला हवा. काल रिफायनरीला झालेल्या विरोधात आंदोलकांची तीव्र नाराजी माध्यमांमधून समोर आली आहे. कोकणात नवीन काही होत असेल आणि त्यावर स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारनं त्याची नोंद घेतली पाहिजे. रिफायनरीला विरोध नेमका का होतोय ते समजून घेतलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी उदय सामंत यांनाही हाच सल्ला दिला. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उद्या बैठक घेण्याची तयारी दाखवली. ‘उद्या होणाऱ्या बैठकीत काही मार्ग निघाल्यास आनंद आहे. जर नाही निघाला तर त्यावर मार्ग काढण्यासंबंधात चर्चा करता येईल, असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

आम्हीच म्हणतो उद्योग गुजरातला चालले!
‘महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला चालले, अन्य राज्यांत चालले. सरकार काही करत नाही, अशी टीका आम्ही सुद्धा अनेकदा करत असतो. त्यामुळंच कोकणात उद्योग वाढावे असं काही लोकांचं मत आहे. कोकणच्या विकासाकडं सरकारचं दुर्लक्ष होतंय अशीही लोकांची तक्रार असते. अशावेळी काही प्रकल्प येत असतील आणि त्याला विरोध होत असेल तर त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. सगळे पर्याय तपासून पाहिले पाहिजेत, असंही पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here