Kokan: राज्यस्तरीय स्क्वॅश खेळ प्रकारात कसाल येथील तन्मयी भगत हिने मिळविला पाचवा क्रमांक

0
21
राज्यस्तरीय स्क्वॅश खेळात कसाल येथील तन्मयी भगतने मिळवला पाचवा क्रमांक
राज्यस्तरीय स्क्वॅश खेळात कसाल येथील तन्मयी भगतने मिळवला पाचवा क्रमांक

आमदार वैभव नाईक यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन तन्मयीचे केले अभिनंदन

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

कसाल : नुकत्याच अमरावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये स्क्वॅश खेळ प्रकारात कसाल येथील विद्यार्थ्यांनी कु. तन्मयी संजय भगत हिने राज्यस्तरावर पाचवा क्रमांक प्राप्त करून तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. स्क्वॅश खेळात जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व करणारी तन्मयी पहिली खेळाडू ठरली आहे. त्याबद्दल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तिच्या निवासस्थानी भेट देत शाल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी अवधूत मालणकर, बाळा कांदळकर, डॉ. बालम, अरुण राणे, पांडुरंग गावडे, गणेश मेस्त्री, विठोबा मळगावकर,वडील -संजय भगत,आई -शुभदा भगत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-1-जुलैपासून-होणार-सॅटेला/

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here