Sindhudurg: माणगाव दत्तमंदिर रस्त्यावर पूल व रस्ता रुंदीकरण डांबरीकरणाचे काम मार्गी

1
189
Sindhudurg: माणगाव दत्तमंदिर रस्त्यावर पूल व रस्ता रुंदीकरण डांबरीकरणाचे काम मार्गी
Sindhudurg: माणगाव दत्तमंदिर रस्त्यावर पूल व रस्ता रुंदीकरण डांबरीकरणाचे काम मार्गी

श्री. दत्तमंदिर विश्वस्त कमिटीचे दीपक सादले यांनी केला आ. वैभव नाईक यांचा सत्कार

प्रतिनिधी-पांडुशेठ साठम

माणगाव : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी याआधी माणगाव दत्तमंदिर रस्त्यावर नवीन पूल (निधी ७१ लाख) मंजूर केला असून हे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच आता माणगाव बाजारपेठ ते दत्तमंदिर जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणासाठी २० लाख रु निधी मंजूर केला असून या कामाचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत श्री. दत्तमंदिर विश्वस्त कमिटीचे दीपक सादले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-तेंडोली-गावात-२-कोटीच्य/

माणगाव दत्तमंदिर रस्त्यावर पूल व रस्ता रुंदीकरण डांबरीकरणाचे काम मार्गी

दत्तमंदिर रस्ता रुंदीकरण व पूल हि कामे प्रलंबित असल्याने या कामांच्या पूर्ततेसाठी श्री. दत्तमंदिर विश्वस्त कमिटीने आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती. आमदार वैभव नाईक यांनी हि दोन्ही कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली त्यानुसार दोन्ही कामासाठी निधी मंजूर करून आता कामे प्रत्यक्षात सुरु करण्यात आली आहेत. मागणी पूर्ण केल्याबद्दल दीपक सादले यांनी आमदार वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका संघटक बबन बोभाटे,माजी. जी. प. सदस्य राजू कविटकर, विभागप्रमुख बंड्या कुडतरकर, विभाग संघटक कौशल जोशी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, स्वप्नील शिंदे,माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे,ग्रा.प.सदस्य अवधूत गायचोर, काजल नाईक,संजय धुरी, नामदेव धुरी,उपविभाग प्रमुख एकनाथ धुरी,रुपेश धारगळकर, ज्ञानेश्वर कुडतरकर, श्री. राऊळ आदींसह माणगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

   

1 COMMENT

  1. […] देवगड: देवगड समुद्रामध्ये एक संशयास्पद बोट 15.40 वा.10 नॉटिकल मध्ये येत असल्याची माहिती मिळाली. सागर कवच अभियानांतर्गत सागरकन्या पोलीस स्पीड बोटीवर पीएसआय साळुंखे पीएसआय चव्हाण , शकील अहमद, सखो तरवडकर वगैरे समुद्रामध्ये पाहणी करत होते. त्यामुळे गस्त घालणाऱ्या पोलिसांनी सदर बोटीचा पाठलाग केला. थोड्यावेळातच सदर बोट ताब्यात घेतली. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-माणगाव-दत्तमंदिर-रस्त… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here