प्रतिनिधी- पांडुशेट साठम
देवगड -शिरगांव हायस्कुलच्या मैदानावर ओम गणेश क्रीडा मंडळ आयोजित दिवस- रात्र प्रकाश झोतामध्ये शूटिंगबॉल स्पर्धा पार् पडल्या.या स्पर्धेत सिंधुदुर्ग, कोल्हापूर,व सांगली जिल्ह्यातील 14 नामवंत संघानी भाग घेतला होता. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आंदुर्ले-ग्रामपंचायत-य/
या स्पर्धेचे उदघाटन संजय कदम, संव्हाजी साटम, अशोक दाभोलकर, सुरेंद्र सकपाळ,सुभाष तळवडेकर, अमित साटम अत्तर सर यांच्या उपस्थितीत पार पडले. अंतिम सामना अतितटीचा झाला होता. 21/14असा युथ फौंडेशन मणेराजुरी जिल्हा सांगली या संघाने विजेतेपद संपादन केले.
बक्षीस वितरण संदीप साटम प्रशांत साटम,संजय कदम, विवेक जामसंडेकर, राजा सचिन, दर्पण कदम, हर्षवर्धन कदम अशोक कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले


