Kokan: लोक अदालतीमधून ३ लाखांची रक्कम वसुल

0
40
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनिय
रायगड जिल्ह्यात नोंदणीविना कार्यरत दिव्यांग संस्थांवर होणार कारवाई

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तालुक्यातील दिवाणीकडील ८, फौजदारी २२ तर ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी, विविध बँका व दूरसंचार निगमकडील एकूण ५३ वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यावेळी दिवाणी, फौजदारी व वादपूर्व प्रकरणांतील मिळून ३ लाख २४ हजार २६८ एवढी रक्कम वसुल करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-उर्मिला-मणचेकर-यांचे-नि/

      तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका बार संघटना वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालयात घेतलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर, अॅड.एस.जी.ठाकूर यांच्या हस्ते झाले. या लोकअदालतीमध्ये न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक एस.एस.कांबळे , एस.एच.खेडेकर, वकिल, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहभाग घेतला. पॅनेल सदस्य म्हणून अॅड.एस.जी.ठाकूर यांनी काम पाहिले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here