Maharashtra: बीपीसीएल मुंबई रिफायनरीने प्रतिष्ठित आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड २०२२ जिंकला

0
108
BPCL,बीपीसीएल मुंबई रिफायनरी,आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड २०२२
Maharashtra: बीपीसीएल मुंबई रिफायनरीने प्रतिष्ठित आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड २०२२ जिंकला

मुंबई, मे ०१, २०२३: मुंबई, भारत- बीपीसीएल मुंबई रिफायनरी उत्पादन श्रेणीतील प्रतिष्ठित ‘आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड २०२२’ ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा आहे आणि मॅल्कम बाल्ड्रिज, द यूरोपियन अवॉर्ड आणि द डेमिंग प्राइज यांसारख्या इतर नामांकित पुरस्कारांप्रमाणेच उत्कृष्टतेचे एक मापदंड मानला जातो. २८ एप्रिल २०२३ रोजी मुंबईच्या चर्चगेट येथील आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वालचंद हिराचंद हॉलमध्ये आयोजित एका शानदार समारंभात बीपीसीएल मुंबई रिफायनरी टीमला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्र-पर्यटन-विका/

    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन   (एयर रायफल शूटिंग) श्री. अभिनव बिंद्रा यांनी बीपीसीएलच्या मुंबई रिफायनरी टीमला हा पुरस्कार प्रदान केला. या टीममध्ये मुंबई रिफायनरीचे  प्रभारी कार्यकारी संचालक श्री. सुब्रमोनी अय्यर, मुख्य महाप्रबंधक (तंत्रज्ञान) श्री. मॅथ्यु एम जॉन,  उपमहाव्यवस्थापक (क्युएमएस /एल अँड डी) श्री. रमेश ठक्कर आणि श्री. रतिश एस (प्रक्रिया तंत्रज्ञान) यांचा समावेश होता.

    आपल्या भाषणात बीपीसीएलच्या मुंबई रिफायनरीचे  प्रभारी कार्यकारी संचालक श्री. सुब्रमोनी अय्यर कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेट लिमिटेडच्या मुंबई रिफायनरीला उत्पादन श्रेणीमध्ये ‘आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड २०२२’ जिंकल्याबद्दल आम्ही विशेष आनंदी व कृतज्ञ आहोत. आम्ही हा पुरस्कार स्वमूल्यांकन साधन म्हणून मानतो आणि आम्हाला विश्वास आहे की, या मूल्यांकन प्रक्रियेचे परिणाम आमच्या संस्थेच्या गुणवत्ता प्रवासाचा नकाशा तयार करण्यासाठी आणि आमच्या प्रणाली आणि प्रक्रियांना आमकही मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतील. आयएमसी आरबीएनक्यूए (IMC RBNQA) च्या पाठिंब्याने, मला खात्री आहे की, भारतीय कंपन्या उत्कृष्ट कामगिरी करत राहतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अधिक योगदान देतील.

    याची संपूर्ण मूल्यमापन प्रक्रिया क्लिष्ट होती, ज्यासाठी ८ महीने लागले. हा अनुप्रयोग स्वतःच एक उत्तम कामगिरीच्या आयएमसी आरबीएनक्यूए (IMC RBNQA) मॉडेलच्या विविध निकषांना प्रतिसाद देणारा संस्थेचा सर्वसमावेशक अहवाल होता. अर्जामध्ये दिलेली माहिती इतकी व्यापक आहे की, या दस्ताजांचा वापर बऱ्याचदा नवीन प्रवेशकर्त्यांसाठी इन्डक्शन मॅन्युअल म्हणून देखील केला जातो. १० डिसेंबर २०२२ रोजी मूल्यांकन चक्राची सर्वसंमतीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर १६,१७ आणि १८ जानेवारी रोजी ज्युरी सदस्यांनी मुंबई रिफायनरीला भेट दिली होती. या तीन दिवसांच्या साइट मूल्यांकन कार्यक्रमादरम्यान ज्युरी सदस्यांनी मुंबई रिफायनरीचे सर्व विभाग, इतर एसबीयू जसे की रिटेल, एलपीजी, ल्युब्स इत्यादी आणि बीपीसीएलच्या विविध संस्थांशी संवाद साधला. आयएमसी आरबीएनक्यूए (IMC RBNQA) ची स्थापना १९९६ मध्ये भारतीय संस्थांमधील कामगिरी उत्कृष्टतेला विशेष मान्यता देण्यासाठी करण्यात आली. आयएमसी आरबीएनक्यूए (IMC RBNQA) ने पुरस्कारासाठी सहा पात्रता श्रेणी स्थापित केल्या आहेत- उत्पादन, सेवा, लघु व्यवसाय, परदेशी संस्था, शिक्षण आणि आरोग्य सेवा. संपूर्ण उद्योगांमध्ये, रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता कार्यक्रम राष्ट्रनिर्मितीसाठी उत्प्रेरक मानला जातो. सर्व अर्जदारांना त्यांच्या सामर्थ्यांवर आणि सुधारण्याच्या संधींवर टिप्पणी करणारे अभिप्राय अहवाल प्राप्त होतात. ‘आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड २०२२’ ने मुंबई रिफायनरीच्या मुकूटात आणखी एका तुर्याची वाढ केली आहे.  

    संपूर्ण बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या टीमला हा सन्मान मिळाल्याचा अभिमान वाटतो, जी गुणवत्ता आणि कार्यप्रदर्शनातील उत्कृष्टतेबद्दलची त्यांची वचनबद्धता दर्शविते. उत्कृष्टतेचे उच्च मापदंड स्थापित केल्याबद्दल आणि त्यांच्या प्रयत्नांना मान्यता दिल्याबद्दल ते आयएमसी आरबीएनक्यूए (IMC RBNQA) ट्रस्टचे आभारी आहेत. टीमने स्वतःसाठी आणि उद्योगासाठी नवीन बेंचमार्क सेट करून ही मानके टिकवून ठेवण्याचा आणि पुढे जाण्याचा निर्धार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here