कोकण: महावितरणात रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या 32 वीज कर्मचाऱ्यांचा गौरव

0
26
महावितरण,वीज कर्मचारी,गौरव
महावितरणात रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या 32 वीज कर्मचाऱ्यांचा गौरव

महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

कोकण परिमंडळ : रत्नागिरीस्थित कोकण परिमंडळ कार्यालयात सोमवार दि.1 मे रोजी 2023 रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अधिक्षक अभियंता मा.श्री. नितीन पळसुलेदेसाई यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर रत्नागिरी व सिंधुदुर्ग मंडळातील  तंत्रज्ञ व यंत्रचालक संवर्गातील 32 कर्मचाऱ्यांचा  उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्काराने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ज्येष्ठ-नेते-शरद-पवारां/

महावितरणात रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या 32 वीज कर्मचाऱ्यांचा गौरव

यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) मा.श्री.वैभव थोरात, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा.श्री.अप्पासाहेब पाटील,  व्यवस्थापक (वित्त व लेखा) मा.श्री. रमेश पावसकर, व्यवस्थापक (मानव संसाधन) मा.श्री. तेजस पाटील यांची उपस्थितीत होते. 

रत्नागिरी मंडळातर्गत  तंत्रज्ञ संवर्गात प्रभाकर माने (उपविभाग- रत्नागिरी शहर), गौतम पवार(रत्नागिरी ग्रामीण), परमेश्वर  जाधव (लांजा),  मनोज पाटकर (राजापूर -1), नानासाहेब शिरसाट (राजापूर -2), बाबू बावधने (देवरूख), विक्रांत भोसले (संगमेश्वर), सचिन साळवी (जाकादेवी), दयानंद पवार (चिपळूण शहर),  विठ्ठल खरात (सावर्डे), बुधाजी लोहकरे(चिपळूण ग्रामीण),  धाऊ गोरे (गुहागर), आशिष कदम (खेड)  तानाजी कांबळे (लोटे), सदानंद साळवी (मंडणगड) , झिमु झोरे (दापोली-1 ), चंद्रकांत होळकर(दापोली-2 )  तर यंत्रचालक संवर्गात संतोष कुलकर्णी (विभाग- रत्नागिरी ), नितीन कोल्हापूरे(चिपळूण),संदिप गुरव (खेड) यांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्काराने  गौरविण्यात आले.

सिंधुदुर्ग मंडळातर्गत  तंत्रज्ञ संवर्गात सहदेव गोसावी(उपविभाग- कुडाळ ), सुधाकर जाधव (सावंतवाडी ), संदीप हुमरमळेकर(ओरोस), कृष्णा सावंत (वेंगुर्ला), पांडुरंग राठोड (दोडामार्ग), हेमंत गोसावी (कणकवली), महेंद्र घाडी (आचरा), निनाद पेटावे (मालवण), सचिन तेली (वैभववाडी), गणपत जाधव (देवगड),  तर यंत्रचालक संवर्गात मकरंद कोचरेकर (विभाग-कुडाळ ), राजेश परूळकर(विभाग-कणकवली )  यांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्काराने  गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन  ,आभार व नियोजन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा.श्री.अप्पासाहेब पाटील यांनी केले.

                                        ——–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here