
सावंतवाडी : लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी अजित रामा सावंत ( रा. ओवळीये वरचीवाडी ) याच्यावर सावंतवाडी पोलिसांनी भादवि कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला येथील न्यायालयाचा हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. परिस्थितीजन्य पुरावे तसेच श्वानापथकाने माग दाखविल्यानंतर मृत लवू सावंत यांचा दत्ताभाऊ असलेल्या अजित सावंत याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/कोकण-तुळस-येथील-जलजीवन-मि/
संशयित अजित सावंत याच्या चप्पलावर तसेच टोपीवर रक्ताचे डाग आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, या गुन्ह्यात पुरावे जरी मिळाले असले, तरी आपण खून केलाच नाही अशी भूमिका संशयित अजित सावंत याने घेतली आहे. त्यामुळे मोबाईल सी. डी. आर च्या माध्यमातून तसेच अन्य पुराव्याच्या शोधात आम्ही आहोत. या प्रकरणात आणखी काही जण असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे शेतात असलेल्या शेत मांगरालगत लवू रामा सावंत शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. त्यानंतर लगेचच पोलीसांनी संशयावरून त्यांच्या धाकट्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर मयत लवू सावंत हे आपल्या शेतात असणाऱ्या मांगरात रात्री झोपले होते. तेथेच त्यांचा डोक्यात जांभा दगड घालून निघूर्ण खून करण्यात आला होता. त्यानंतर संशयावरून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. या चौकशीत
सकाळी त्यांचा भाऊ शेतात गेला असता त्याला भाऊ मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. याबाबतची खबर ओवळे पोलीस पाटील यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. यानंतर सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, सहा. पोलीस निरीक्षक यशवंते, पोलीस हवालदार दत्ता देसाई आदी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरू आहे. सदरचा खून हा जमिनीच्या वादातून घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

