मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी गोवा सरकार निविदा काढल्या आहेत .गोव्याच्या पाणीपुरवठा विभागाने परनेम मधील नागझेर गावापासून ते मोप विमानतळापर्यंत पाईपलाईन टाकण्याचे ठरविले आहे .ही पाइपलाइन पाण्याचा अतिउच्चदाबही सहन करू शकेल अशी असणार आहे जेणेकरून पाण्याच्या दाबामुळे ती कधीही फुटू शकणार नाही
या सर्व प्रकल्पाची किंमत हि २८.६ लाख असणार आहे आणि त्याच्या निविदाही निघाल्या असल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. याची बोली या बुधवारपर्यंत उघडणार आहे असेही त्यांनी सांगितले. हि ३०० मी मी ची पाईपलाईन असणार असून त्याला स्वनियंत्रित पाण्याचा प्रवाह चालू आणि बंद करणारी प्रणाली असणार आहे.हा प्रोजेक्ट २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे असेही त्यांनी सांगितले.या विमानतळासाठी १.२ मिलियन लिटर्स पाणी लागणार असून त्याचे पहिल्या भागातील पाणी हे तिलारी धरणातून दिले जाणार आहे.