Maharashtra: टीव्हिएस मोटर्सने किडझॅनिया सोबतच्या भागीदारीच्या माध्यमातून मुलांना रेसिंगचा अनुभव घेता येणार

0
39
रेसिंग,किडझॅनिया,TVS,
भारतातील तरुण चालक आणि उत्साही जनतेसाठी मोटर रेसिंगचे जग खुले करायाला किडझॅनियासोबत भागीदारी

मुंबई मे२०२३१९८२ पासून या प्रतिभेचे जतन व संगोपन करताना टीव्हिएस रेसिंगने तरुण उत्साही चालकांसाठी एक अनोखा आणि अशा प्रकारचा पहिलाच रेसिंग अनुभव तयार करण्यासाठी किडझॅनिया या जगातील आघाडीच्या एड्यूटेनमेंट थीम पार्कसोबत भागीदारीची घोषणा केली आहे.

मोटर रेसिंग बद्दलच्या मिथकांना आणि रूढींना तोडून मोटरस्पोर्टस वाढवण्यासाठी वचनबद्ध असलेले टीव्हिएस रेसिंग ५ ते १६ वर्षे वयोगटातील नवीन चालकांसाठी त्यांच्या गरजा आणि मागणीनुसार सानुकूल करून काळजीपूर्वक व विचारपूर्वक तयार केलेले अनुभव क्षेत्र आणत आहे. किडझॅनिया येथील टीव्हिएस रेसिंग अनुभव क्षेत्र तरुणांना रेसिंग संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक परस्परसंवादी शिक्षण क्षेत्रे, ज्ञानाची देवाणघेवाण करणारी सत्रे आणि मिनी ट्रॅक रेस एरीना प्रदान करेल.https://sindhudurgsamachar.in/kokan-कांदळवन-सागरी-जैवविविधत/

४० वर्षांपेक्षा जास्त काळाचा रेसिंगचा वारसा आणि परंपरा पाठीशी असणाऱ्या टीव्हिएस रेसिंगने १९९४ मध्ये वन मेक चॅम्पियनशिप सुरू केली आणि अशा प्रकारे या कार्यक्रमाचा भारतामध्ये चार श्रेणींमध्ये विस्तार केला. यामध्ये समाविष्ट असलेली एक श्रेणी म्हणजे रुकी श्रेणी (Rookie), जी १३ ते १८ वर्षे वयोगटातील तरुणाच्या प्रतिभेचे जतन आणि संवर्धन करण्यावर लक्ष केंद्रित करते.  टीव्हिएस रेसिंगने २०२१ पासून देशात ५० पेक्षा जास्त रुकी चालकांना प्रशिक्षण दिले आहे. शिवाय, २०२२ मध्ये टीव्हिएस रेसिंगने पहिल्यांदाच एशिया वन मेक चॅम्पियनशिप आयोजित केली होती.

भारतात सर्वात प्रथम असा अनुभव देणारे म्हणून टीव्हिएस मोटर्सने किडझॅनिया येथे विचारपूर्वक तयार केलेले अनुभव क्षेत्र निर्माण करण्यासाठी आपले पहिले पाऊल उचलले आहे, ज्याचा उद्देश तरुण चालकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य सुधारणे व अधिक समृद्ध करणे आणि रेसिंग हे ट्रॅक साठी आहे हे समजून घेण्याची परिपक्वता वाढवणे हे आहे. उत्साही तरुण चालकांना टीव्हिएस रेसिंग मोटरस्पोर्टसचा नियंत्रित भागात सुरक्षित व रोमांचकारी अनुभव देऊन प्रोत्साहन देण्याच्या टीव्हिएसच्या वचनबद्धतेचा ही भागीदारी एक विस्तार आहे.

या भागीदारीबाबत बोलताना टीव्हिएस मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय  संचालक श्रीसुदर्शन वेणू म्हणाले, टीव्हिएस रेसिंगने ४० वर्षांपेक्षा जास्त काळ भारतात रेसिंगचा प्रचार करून चॅम्पियन निर्माण केले आहेतजगभरातील ग्राहकांसाठी सुरक्षित मात्र तरीही रोमांचक असा रेसिंग अनुभव अजून विस्तारीत करण्यास आम्ही उत्सुक आहोतरेसिंग आणि व्हिडिओ गेम्स मजा आणि उत्साह निर्माण करतात आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की, किडझॅनिया सोबतच्या आमच्या या भागीदारीच्या माध्यमातून आम्हाला मुलांना अशा उत्कृष्ट रेसिंगचा अनुभव देता येणे शक्य आहे.

 टीव्हिएस मोटर कंपनीचे प्रिमियम व्यवसाय प्रमुख श्रीविमल सुंबली म्हणाले, भारतातील  मुलांसाठी मोटारसायकल रेसिंगचा असा पहिला अनोखा अनुभव प्रदान करण्यासाठी किडझॅनियासोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.  भारतातील तरुण चालकांसाठी सुरक्षित तरीही रोमांचकारी रेसिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला ही भागीदारी अजून खतपाणी घालेलआकांक्षा या बालपणापासून निर्माण होतात तर प्रेरणा तरुण वयात मिळतात या तत्वज्ञानाने प्रेरित होऊन आमचे लहान मुलांना मजेदार परस्पर संवादी अनुभव प्रदान करण्याचे आणि सुरक्षित  नियंत्रित वातावरणात रेसिंगचा आनंद देण्याचे ध्येय आहेदेशात दुचाकी रेसिंगला प्रोत्साहन देण्यासाठी टीव्हिएस रेसिंग नेहमीच आघाडीवर राहिली आहेआम्हाला विश्वास आहे कीहा अनोखा उपक्रम केवळ मुलांसाठी एक संस्मरणीय अनुभवाच निर्माण करणार नाही तर पुढच्या पिढीला रेसिंगची आवड निर्माण करण्यास प्रेरणा देईल.

  टीव्हिएस रेसिंग अनुभव क्षेत्र खालील पर्याय प्रदान करेल:

· टीव्हिएस अपाची आरआर ३१० असेंब्ली अरेना

·  संकेतांचा वापर करून, दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्याआधारे किट वापरुन असेंब्ली लाइन समजून घेण्यासाठी तुमची दुचाकी डिझाईन करण्यासाठी टीव्हिएस अपाची आरआर ३१० डिझाईन स्टुडिओ

·  टीव्हिएस रेसिंग सिम्युलेटर अनुभव आणि रायडिंग स्कूल तर्फे एक रायडिंग लायसन्ससह टीव्हिएस रेसिंग रेसर

·        खास तयार केलेल्या मोटरसायकलवर टीव्हिएस रेसिंग रेसर@ रेस ट्रॅक

तरुण चालकांसाठी आणि उत्साही लोकांसाठी हेलमेट, हातमोजे, रायडिंग जॅकेट आणि टीशर्ट अशा सामानासह रायडिंग गियर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here