Maharashtra: वोक्सवॅगन इंडियाची प्रमुख एसयूव्हीडब्ल्यू, टिग्वान आता झाली अधिक प्रगत

0
18
वोक्सवॅगन इंडियाची प्रमुख एसयूव्हीडब्ल्यू, टिग्वान आता झाली अधिक प्रगत
वोक्सवॅगन इंडियाची प्रमुख एसयूव्हीडब्ल्यू, टिग्वान आता झाली अधिक प्रगत
मुंबईभारत – वोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी प्रगत वैशिष्ट्यांसह टिग्वानचे सुधारित रूप सादर करत असल्याची घोषणा केली आहे. वोक्सवॅगनची ही प्रमुख एसयूव्हीडब्ल्यू टिग्वान नवीन ड्युएल-टोन स्टॉर्म ग्रे इंटेरियर्स अतिशय मागणी असलेल्या वायरलेस मोबाईल चार्जिंग सुविधेसह उपलब्ध आहे.  त्यामुळे आता प्रवासात असताना देखील मोबाईल चार्जिंगची चिंता करावी लागणार नाही. प्रगत टिग्वानमध्ये आरडीई नियमांचे पालन करण्यात आले आहे.  गाडीची किंमत ३४.६९ लाख रुपये आहे (एक्स-शोरूम).https://sindhudurgsamachar.in/kokan-झुलता-पुल-येथे-पोलिसांची/
 
अरुंद जागेत देखील अगदी सहजपणे आणि पटकन पार्किंग करता यावे यासाठी अपडेटेड टिग्वानमध्ये पार्क असिस्ट (लेव्हल १ एडीएएस सिस्टिम) आहे. पार्क असिस्ट ही सुविधा म्हणजे जणू तुमच्या पर्सनल पार्किंग असिस्टंट प्रमाणेच काम करते.
 
प्रगत वोक्सवॅगन टिग्वानबद्दल वोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड डायरेक्टर श्री. आशिष गुप्ता यांनी सांगितलेजागतिक पातळीवरील आमची बेस्ट-सेलर कार वोक्सवॅगन टिग्वानची मागणी सातत्याने वाढत आहे. अपडेटेड टिग्वानमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना स्टाईलकामगिरीप्रीमियमनेससुरक्षा आणि श्रेणीतील सर्वोत्तम वैशिष्ट्ये यांचे अतुलनीय मिलाप उपलब्ध करवून देत आहोत. निर्दोष जर्मन अभियांत्रिकीदर्जेदार बांधणीसुरक्षा व ड्राइव्ह करण्याचा आरामदायीमजेशीर अनुभव यामुळे टिग्वानने स्वतःचा प्रचंड प्रभाव निर्माण केला आहे. प्रगत टिग्वानमुळे मोठ्या संख्येने भारतीय ग्राहक वोक्सवॅगन परिवारात सहभागी होतीलआणि त्यांना आमच्या या प्रमुख मॉडेलचा अनुभव व आनंद घेता येईल.”
 
वोक्सवॅगनमध्ये आम्ही सुरक्षेच्या बाबतीत जराही तडजोड करत नाही त्यामुळे नियामक आवश्यकतांना अनुसरून टिग्वानमध्ये मागील प्रवाशांसाठी सीटबेल्ट रिमाइंडरसहा एअरबॅग्सअँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस)ईएससीअँटी-स्लिप रेग्युलेशन (एएसआर)ईडीएलईडीटीसी – इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोलहिल स्टार्ट असिस्टहिल डिसेंट कंट्रोलऍक्टिव्ह टीपीएमएसमागे तीन हेड रेस्ट्स३-पॉईंट सीटबेल्ट्सआयएसओफिक्स x२ आणि ड्रायव्हर अलर्ट सिस्टिम्स यासारख्या नाविन्यपूर्ण सुरक्षा तंत्रज्ञानाचा व सहायता प्रणालींचा समावेश करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या या वैशिष्ट्यांमुळे गाडीतील व गाडीच्या आजूबाजूच्या प्रवाशांची सुरक्षा अबाधित राखली जाते.
 
अपडेटेड टिग्वान भारतातील ११५ शहरांमधील १५७ सेल्स व १२४ सर्व्हिस टचपॉइंट्सच्या वोक्सवॅगन इंडियाच्या नेटवर्कमध्ये खरेदी करता येईल. उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या डीलरशिपला किंवा वोक्सवॅगन इंडिया वेबसाईटला भेट द्या.
 
वोक्सवॅगन इंडियाची प्रमुख एसयूव्हीडब्ल्यू, टिग्वान आता अधिक प्रगत वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे. टिग्वानमध्ये अंतर्गत सजावटीचा नवा पर्याय, ड्युएल-टोन स्टॉर्म ग्रे इंटेरियर्स, त्यासोबत सध्या भरपूर मागणी असलेली वायरलेस मोबाईल चार्जिंगची सुविधा देखील आहेत.  
 
तुमच्या दिमतीला असेल पार्क असिस्ट, तुमचा पर्सनल पार्किंग असिस्टंट: चिंचोळ्या जागेत देखील गाडी पटकन आणि खूप सहजपणे पार्क करता यावी यासाठी आता टिग्वानमध्ये पार्क असिस्ट (लेव्हल १ एडीएएस सिस्टिम) आहे. वोक्सवॅगन इंडियासाठी सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची असल्याने टिग्वानमध्ये मागील सीट्ससाठी देखील सीटबेल्ट रिमाइंडर आहे.  सहा एअरबॅग्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), ईएससी, अँटी-स्लिप रेग्युलेशन (एएसआर), ईडीएल, हिल स्टार्ट असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, इंजिन ड्रॅग टॉर्क कंट्रोल, ऍक्टिव्ह टीपीएमएस, मागील सीट्ससाठी ३ हेड रेस्ट्स, ३ पॉईंट सीट बेल्ट्स, आयएसओफिक्स आणि ड्रायव्हर अलर्ट सिस्टिम्स यासारखे नाविन्यपूर्ण, सुरक्षा तंत्रज्ञान उपलब्ध करवून देण्यात आले आहे.

अपडेटेड वोक्सवॅगन टिग्वानमध्ये आरडीई नियमांचे पालन करण्यात आले असून तिची किंमत ३४.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. दमदार कामगिरी आणि प्रगतिशील डिझाईन असलेली टिग्वान स्वतःचा अष्टपैलू प्रभाव निर्माण करते. अत्याधुनिक, सुविधाजनक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण ‘एलिगन्स’  या टिग्वानच्या व्हेरियंटमध्ये २.०एल टीएसआय इंजिन, ७-स्पीड डीएसजी ४मोशन (ऑल-व्हील ड्राइव्ह) ट्रान्समिशन, १३.५३ किमी प्रति लिटर इतकी सुधारित इंधन बचत क्षमता (७% नी) (एआरएआय सर्टिफाईड) आहे. नवीन टिग्वानमध्ये रंगांचे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत – नाईटशेड ब्लु, पर्ल इफेक्टसह ऑरिक्स व्हाईट, डीप ब्लॅक, डॉल्फिन ग्रे आणि रिफ्लेक्स सिल्व्हर 

.
 

 
 
वोक्सवॅगन इंडियाची प्रमुख एसयूव्हीडब्ल्यू, टिग्वान आता झाली अधिक प्रगत
वोक्सवॅगन इंडियाची प्रमुख एसयूव्हीडब्ल्यू, टिग्वान आता झाली अधिक प्रगत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here