Maharashtra: ड्रीम ११ कप १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा

0
16
ड्रीम ११ कप १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा
सचिन तेंडुलकर संघ ७२.१ षटकांत सर्वबाद २९२ अनिर्णित वि. रवी शास्त्री संघ - ८८.१ षटकांत सर्वबाद २५२ धावा(समृद्ध भट ५७, शाहिद शेख १०१, नीरज धुमाळ २२, शॉन कोरगावकर नाबाद १३; केदार मालुसरे २५ धावांत २ बळी, वेदांत गोरे ४९ धावांत २ बळी, युग असोपा २३ धावांत ३ बळी)..

शाहिद शेखची शतकी खेळी व्यर्थ ; तेंडुलकर आणि गावस्कर संघ  पहिल्या डावातील आघाडीवर विजयी

मुंबई, १९ मे :  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येत असलेल्या ड्रीम ११ निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या आज संपलेल्या पहिल्या साखळी लढतीत सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर पहिल्या डावातील आघाडीवर विजयी मिळविला.  कर्नाटक सपोर्टींगवरील लढतीत तेंडुलकर संघाच्या २९२ या धावसंख्येला उत्तर देताना आज रवी शास्त्री संघाच्या शाहिद शेख याने आज शतकी खेळी केली. २०५ चेंडूत त्याने १०१ धावा करताना १० चौकार लगावले. त्याने समृद्ध भट (५७) याच्या साथीने  दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी करून आपल्या संघासाठी आघाडी घेण्याचे स्वप्न दाखविले.  नंतर नीरज धुमाळ (२२) आणि शॉन कोरगावकर (नाबाद १३) यांच्याव्यतिरिक्त अन्य फलंदाज पार ढेपाळल्याने ८ बाद २२९ वरून त्यांचा डाव २५२ धावांत आटोपला. युग असोपा यानेच शाहिद खानचा अडसर दूर करून आपल्या संघाचे पहिल्या डावातील आघाडी घेण्याचे प्रमुख काम केले. त्याने २३ धावांत ३ तर वेदांत गोरे (४९/२) आणि केदार मालुसरे (२५/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-केंद्रीय-राज्यमंत्री-र/

दरम्यान ओव्हल  येथील वेंगसरकर अकादमीच्या मैदानात काल २५ धावांनी पिछाडीवर पडलेल्या दिलीप वेंगसरकर संघाने आज  दमदार फलंदाजी केली. सुदान सुंदरराज (३९), आयुष शिंदे (३८), अगस्तेय उपाध्याय (५५) , दर्शन राठोड ३७ आणि क्रिश उपाध्याय नाबाद २२  यांनी दमदार फलंदाजी करून ७ बाद २२९ धावांवर आपला डाव घोषित केला. नंतर युवान शर्मा (२७ धावांत ३ बळी ) आणि दर्शन राठोड (१३/२ बळी) यांनी जबरदस्त गोलंदाजी करताना गावस्कर संघाची अवस्था ५ बाद २३ अशी करून निर्णायक विजयाच्या दिशेने वाटचाल केली. मात्र पहिल्या डावातील संकटमोचक अरहान पटेल (नाबाद २६) आणि ओम बांगर (नाबाद २३) यांनी त्यांचे मनसुबे उधळून लावत ४९ धावांची अभेद्य भागी रचून खेळ संपताना ५ बाद ७२ धावा करत ही लढत अनिर्णित राखली.

या स्पर्धेतील दुसऱ्या साखळी लढती आता २२-२३ मे रोजी खेळविण्यात येणार आहेत.

संक्षिप्त धावफलक –  दिलीप वेंगसरकर संघ –  सर्वबाद ९४   आणि ६२  षटकांत ७ बाद २२९ डाव घोषित (सुदान सुंदरराज ३९, आयुष्य शेटे ३८, अगस्तेय उपाध्याय ५५, दर्शन राठोड ३७, क्रिश उपाध्याय २२ नाबाद, यश शर्मा  १३; नाथनिएल फरेरा २४ धावांत ३ बळी, अब्दूर रहमान ४८/२) अनिर्णित वि. सुनील गावस्कर संघ – ४३ षटकांत सर्वबाद ११९ आणि  २८ षटकांत ५ बाद ७२ (अरहान पटेल नाबाद २६, ओम बांगर नाबाद २३ ; युवान शर्मा २७ धावांत ३ बळी , दर्शन राठोड १३ धावांत २ बळी )

सचिन तेंडुलकर संघ ७२.१ षटकांत सर्वबाद २९२ अनिर्णित  वि. रवी शास्त्री संघ – ८८.१  षटकांत  सर्वबाद २५२ धावा(समृद्ध भट ५७, शाहिद शेख १०१, नीरज धुमाळ २२, शॉन कोरगावकर नाबाद १३; केदार मालुसरे २५ धावांत २ बळी, वेदांत गोरे ४९ धावांत २ बळी, युग असोपा २३ धावांत ३ बळी)..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here