Maharashtra: जावा येझ्दी नोमॅड्स आयबेक्स ट्रेल २०२३ साठी झन्सकारला रवाना

0
32
जावा येझ्दी नोमॅड्स,आयबेक्स ट्रेल २०२३
जावा येझ्दी नोमॅड्स आयबेक्स ट्रेल २०२३ साठी झन्सकारला रवाना

पुणे – आयबेक्स ट्रेलचे दोनदा यशस्वी आयोजन केल्यानंतर तिसरी आवृत्ती जाहीर करताना जावा येझ्दी मोटरसायकल्सला आनंद होत आहे. हा ट्रेल म्हणजे जावा येझ्दी नोमॅड्स या उपक्रमाअंतर्गत आयोजित केली जाणारी प्रसिद्ध राइड आहे. यावेळची सफर आणखी रोमांचक व साहसी करण्यात आली असून रायडर्स झन्स्कार लँडस्केपवर विजय मिळवण्यासाठी रवाना झाले आहेत. 

यावर्षीच्या सफरीमध्ये रायडर १३ ते २३ जुलै अशी ११ दिवसांची राइड पार करणार असून त्यादरम्यान तब्बल ११३२ किलोमीटरचे अंतर पूर्ण करतील. अवघड रस्ते, वळणं, पायवाटा आणि झन्स्कारच्या डोंगराळ भागातून जाणारे खडकाळ रस्ते, शिवाय १७,४८० फुटांची उंचीवरचा प्रवास करताना रायडर्सना – मनाली- जिस्पा- पूर्णे – पेन्सी ला – फोटोस्कार – लेह – सरचू – मनाली अशी निसर्गरम्य प्रदेशांची अनुभूती घेता येईल. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-आईच्या-मातृत्वा/

या प्रदेशात आढळणाऱ्या नैसर्गिक तांब्याच्या साठ्यामुळे (झन) आणि तिथली दरी (स्कार) यातून तयार झालेले झन्स्कार तिथल्या भव्य झन्सकार रांगांसाठी प्रसिद्ध आहे. या रांगेमुळे लडाख आणि काश्मीरचं खोरं असा स्वतंत्र भाग तयार झाला आहे. या प्रेरणादायी मोहिमेच्या माध्यमातून नोमॅड्स झन्स्कारचा अवघड प्रदेश, शिन्कु ला (१५,५८० फूट) आणि पेन्सी ला (१४,४०० फूट) असे उंच पर्वत पार करतील, पवित्र गुम्बो रंगजन पर्वताचं दर्शन घेतील, ड्रँग ड्रंग ग्लेशियरची झलक पाहातील, नद्यांचे विशाल पात्र ओलांडतील आणि ऑफ रोड वाटांवरून प्रवास करत थंड वाळवंटातून पुढे जातील. यावर्षीच्या प्रवासात समाविष्ट करण्यात आलेली आणखी एक थरारक गोष्ट म्हणजे फुगटल गोन्पाचा ट्रेक. ही ऐतिहासिक मॉनेस्ट्री नैसर्गिक गुहेच्या भोवती बांधण्यात आली असून फार कमी जण पायी चालत तिथपर्यंत पोहोचू शकतात. हिमालयातला कोणताही प्रवास लेहला भेट दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे परतीच्या प्रवासात रायडर्स लेहमार्गे मनालीपर्यंत येतील व प्रवासाची सांगता करतील.

या प्रवासात सहभागी होण्यासाठी प्रत्येक रायडरला २५,००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्यात रायडर्सच्या राहाण्याची सोय (ट्विन शेयरिंग), रोजचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण, वैद्यकीय आणि बाकीच्या सुविधा, सामान वाहून नेणे, सर्व प्रकारचे परवाने व रायडिंग मर्चंडाइज यांचा समावेश आहे. रायडिंग सोपे व्हावे यासाठी सहभागींना जावा येझ्दीच्या कुशल तंत्रज्ञ मदत करणार आहेत. वैद्यकीय पथक सोबत असेल, शिवाय प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी रायडर्सना प्रथमोपचाराचे साहित्य दिले जाणार आहे.

ही एक्सक्लुसिव्ह जावा येझ्दी नोमॅड राइड असून त्यासाठी मर्यादित संख्येनं प्रवेश दिला जाईल. इच्छुकांनी पुढील लिंकवर नावनोंदणी करावी: https://jawayezdinomads.kogotrips.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here