भारतातील आशादायक स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वांसाठी स्मार्ट लॉजिस्टिक्स तयार करण्यासाठी डिझाईन केलेला गुंतवणूक आणि व्यावसायिक भागीदारी कार्यक्रम
भारत, २५ मे, २०२३: FedEx Corp. (NYSE: FDX) ने भारताच्या प्रमुख बाजारपेठेत तसेच अधिक व्यापक प्रदेशांमधील उदयोन्मुख आणि सुरुवातीच्या टप्प्यातील डिजिटल स्टार्ट अप्सना सहकार्य आणि भागीदारी करण्यासाठी FedEx इनोव्हेशन लॅब (FIL) लॉंच केली.https://sindhudurgsamachar.in/kokan-अलिबाग-तालुक्यातील-समस्/
FedEx इनोव्हेशन लॅब (FIL) या भागीदारींमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणूक करेल आणि FedEx नेटवर्क, संसाधने व जागतिक ग्राहक आधार यांच्या माध्यमातून स्टार्टअप कंपन्यांसाठी क्षमता व बाजारपेठेतील गती या दृष्टीने अतिरिक्त मूल्य प्रदान करेल. ही भागीदारी आधुनिक पुरवठा साखळीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचे कार्य आणि उत्पादन निरंतर विकसित करत असल्यामुळे ही सहभागीदारी जागतिक स्तरावर FedEx प्रगत डिजिटल क्षमतांचा विस्तार करण्यास मदत करेल. FedEx इनोव्हेशन लॅब (FIL) द्वारे झालेल्या या भागीदारीमुळे जागतिक स्तरावर ग्राहकांना फायदा होईल.
FedEx इनोव्हेशन लॅब (FIL) ची पहिली गुंतवणूक एंटरप्राइज आर्टीफिशिअल इंटलिजन्स सोल्युशन्स मध्ये आघाडीवर असणाऱ्या ‘मॅड स्ट्रीट डेन’ (Mad Street Den) या एका संगणक आणि आर्टीफिशिअल इंटलिजन्स (AI) संबंधित कंपनीमध्ये आहे. या स्टार्ट अपचे आर्टीफिशिअल इंटलिजन्स (AI) प्लॅटफॉर्म विपणन, उत्पादन आणि तंत्रज्ञान टीम्सना त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास आणि अधिक अनुकूलित करण्यास मदत करेल. त्यांची उत्पादने रिटेल, आरोग्य सेवा, वित्त, प्रसार माध्यमे, मनोरंजन आणि शिक्षण अशा अनेक उद्योगांमध्ये आहेत.
“जगातील तंत्रज्ञान अग्रणींच्या नावीन्यपूर्ण धोरणांच्या केंद्रस्थानी भारत आहे. आम्ही जे नवीन तंत्रज्ञान आणि प्रतिभा व कौशल्यांच्या व्यापक श्रेणींच्या वापराला महत्व देतो त्यास अलीकडेच आम्ही हैदराबाद मध्ये पहिले (प्रगत क्षमता समुदाय) Advanced Capability Community सुरू करण्याच्या योजनेची घोषणा केल्यानंतर आता FedEx इनोव्हेशन लॅब (FIL) अजून जास्त मजबूत करते,” FedEx Express च्या मिडलईस्ट, भारतीय उपखंड आणि आफ्रिका या प्रदेशांचे वरिष्ठ उपाध्यक्षा सुश्री. कामी विश्वनाथन म्हणाल्या. “आज उद्योगक्षेत्रात असे मोठ्या प्रमाणावर परस्पर लाभ आहेत जे मिळवता येऊ शकतील तसेच जागतिक लॉजिस्टिक उद्योग क्षेत्रात बदल घडवून आणण्यास मदत करण्यासाठी प्रचंड मोठी संधी देखील उपलब्ध आहे. आमच्या ध्येयदृष्टीमध्ये सामायिक आवड असलेल्या भारतातील नवकल्पकांच्या कोणत्याची स्वारस्याचे आम्ही स्वागत करू.”
FedEx इनोव्हेशन लॅब (FIL) सर्वांसाठी स्मार्ट लॉजिस्टिक्स तयार करण्यात मदत करण्यासाठी अजून जास्त भागीदारी व सहयोग शोधत आहे. एफआयएल (FIL) चे प्राथमिक लक्ष भारत आहे, जे आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठया स्टार्ट अप इकोसिस्टमचे घर असून भारताने ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या क्रमवारीतही प्रगती केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील डिजिटल लॉजिस्टिक कंपन्यांची एक समृद्ध श्रेणीच भारत प्रदान करतो, ज्यामधून FedEx भागीदारांचा अर्थपूर्ण पोर्टफोलिओ तयार करू शकते. विस्तीर्ण प्रदेश हा सुद्धा तांत्रिक नवकल्पना आणि भागीदारीच्या संधींचा केंद्रबिंदु आहे.
FedEx Express च्या अशिया पॅसिफिक, मिडल ईस्ट, आणि आफ्रिका (AMEA) प्रदेशाच्या अध्यक्षा सुश्री. कवल प्रीत म्हणाल्या, “नावीन्य आणि कल्पकता हे आमच्या व्यवसाय धोरणांमध्ये अंतर्भूतच आहे. आम्ही या वर्षी आमचा ५० वा वर्धापन दिन साजरा करत असताना आमच्या ग्राहकांसाठी ‘व्हॉटस नेक्स्ट’ (What’s Next) मध्ये एफआयएल (FIL) आणणे हे आणखी एक रोमांचक पाऊल आहे. ग्राहकांना अधिक जास्त मूल्य व उत्तम अनुभव देण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्ससह जास्त स्मार्ट पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी आम्ही प्रगत तंत्रज्ञान व डेटाचलित इन्साइट वापरण्यास वचनबद्ध आहोत.”
[1] https://www.businessleader.co.uk/what-are-the-top-startup-ecosystems-in-the-world/
[1] https://techcollectivesea.com/2022/09/16/apac-startups-kpmg-report/


