देश-विदेश : बीपीसीएलच्या आर अँड डी सेंटरने केलेले संशोधन आणि पेटंट्समुळे संपूर्ण क्षेत्रात क्रांती येणार

0
141
बीपीसीएलच्या आर अँड डी सेंटर, संशोधन आणि पेटंट्स,
देश-विदेश : बीपीसीएलच्या आर अँड डी सेंटरने केलेले संशोधन आणि पेटंट्समुळे संपूर्ण क्षेत्रात क्रांती येणार

बीपीसीएलतर्फे अधिक निर्मळ उत्सर्जनासाठी इथेनॉल- डिझेल ब्लेंड उपलब्ध

·         आर अँड डी विभागाद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित १६४ पेटंट्स दाखल

·         बायो- रिफायनरी टाकाऊ पदार्थांचे मूल्य वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गाचा वापर

·         क्रुड ऑइलच्या सोर्सिंगसाठी तसेच रिफायनरीवर देखरेख करण्यासाठी आणि त्यापासून जास्त लाभ मिळवण्यासाठी बीपीसीएलतर्फे क्रांतीकारी तंत्रज्ञान

·         बीपीसीएलच्या आर अँड डी विभागातर्फे उर्जा संवर्धनासाठी उच्च कार्यक्षमता असलेला एलपीजी बर्नर विकसित

नवी दिल्ली: बीपीसीएलची आर अँड डी सेंटर्स (संशोधन आणि विकास केंद्रे) अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत कायमच आघाडीवर राहिली आहेत. २००१ मध्ये स्थापना झाल्यापासून कॉर्पोरेट आर अँड डी केंद्राने क्रांतीकारी संशोधन व विकासासाठी व्यासपीठ पुरवले आहे. ल्युब्रिकंट संशोधन क्षेत्रातील ल्युब्ज या आघाडीच्या केंद्राच्या मदतीने बीपीसीएल आर अँड डी सेंटर हरित व अधिक निर्मळ इंधन तयार करण्यासाठी झटत आहे. केंद्राने गेल्या काही वर्षांत संशोधनावर जास्त भर, कार्बन कॅप्चर व त्याचा वापर, हरित हायड्रोजन, जैवइंधने, अत्याधुनिक हरित इंधन, पेट्रोकेमिकल्स आणि व्यवसायातील स्थैर्य यांवर लक्ष केंद्रित केले आहे. यातून कंपनीची पर्यावरण आणि उर्जेचे नवे स्त्रोत शोधण्यासाठी असलेली बांधिलकी दिसून येते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सावित्रीबाई-फुले-आणि-अह/

या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियमच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट (आर अँड डी) विभागाला ग्रेटर नॉयडा येथील कॉर्पोरेट आर अँड डी सेंटरमध्ये अत्याधुनिक सुविधा सादर करताना अभिमान वाटत आहे. नाविन्यपूर्ण आणि शाश्वत सुविधांवर भर देत बीपीसीएल आर अँड डीने आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीचे संशोधन केंद्र असे स्थान मिळवले आहे.

इतक्या वर्षांत या विभागाने विविध विक्रमी टप्पे पार केले असून त्यात नाविन्यपूर्ण संशोधनासाठी १६४ पेटंट्स, वेगवेगळ्या देशांत मिळालेली ८७ पेटंट्स, १७ तंत्रज्ञान/उत्पादनांचे व्यावसायिकरण, २३० पेक्षा जास्त वैज्ञानिक पेपर्स आणि पुस्तकातील चॅप्टर्स यांचा समावेश आहे. या विभागाने केलेल्या महत्त्वाच्या संशोधनामध्ये तांदळाच्या पेंढ्यापासून बनवलेल्या २जी जैव- रिफायनरी राखेपासून हरित सिलिका, कंपोस्ट करता येण्यासारखए बायोमटेरियल, सुपरअब्झॉरबंट पॉलीमर (एसएपी) उत्पादने

भारत पेट्रोलियमची शाश्वततेशी संबंधित ध्येये, शून्य उत्सर्जनाचा नियम यांच्याशी सुसंगत राहात बीपीसीएल आर अँड डीने उत्सर्जन कमी करण्यासाठी डिझेल- इथेनॉल ब्लेंडसारखे उपक्रम हाती घेतले आहेत. या विभागाचे डिजिटल उपक्रम आणि प्रख्यात संस्थांसह हाती घेतलेली कामे यामुळे देशात नाविन्यपूर्ण संशोधनाला चालना मिळण्यास मदत होत आहे.

बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. जी. कृष्णकुमार म्हणाले,  एनर्जायजिंग लाइव्ह हे आमचे मुख्य तत्व असून गुणवत्ता, नाविन्य व तंत्रज्ञानाचा वापर करणे हे आमचे ध्येय आहे. ग्राहकांना आमचे पहिले प्राधान्य असते. आमच्या सक्षम आर अँड डी टीमने सर्जनशीलतेसह उपयुक्त तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उत्पादने व प्रक्रिया तयार केल्या आहेत. त्यामुळे आमचा नफा वाढण्यास तसेच पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यात मदत झाली. गुणवत्तेच्या ध्यासातूनच आम्हाला पेटंट्सच्या मोठ्या श्रेणीसह विविध मानसन्मान मिळवण्यास मदत झाली आहे.

पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयाचे माननीय मंत्री श्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक नेतृत्वाखाली बीपीसीएल तंत्रज्ञाना विस्तार करत आहे आणि अत्याधुनिक आर अँड डी उपक्रमांच्या मदतीने शाश्वतता साध्य करत आहे. गुणवत्तेचा ध्यास, भारताच्या उर्जा क्षेत्रासाठी दिलेले भरीव योगदान आणि जागतिक पातळीवर मिळवलेले आघाडीचे स्थान अशा कामगिरीबद्दल मी बीपीसीएल टीमचे अभिनंदन करतो.

कार्बन कॅप्चर, हरित हायड्रोजन, जैवइंधने, पेट्रोकेमिकल्स आणि व्यवसायातील स्थैर्य यांच्यावर लक्ष केंद्रित करत बीपीसीएलच्या आर अँड डी विभागाने या क्षेत्रात चांगली कामगिरी केली. अत्याधुनिक सुविधा, कुशल शास्त्रज्ञ, इंजिनियर्स व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची टीम आणि धोरणात्मक भागिदारी यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवणे शक्य झाले.

बीपीसीएलच्या आर अँड डी विभागाने डिजिटल क्षेत्रात लक्षणीय टप्पा पार केला आहे. कंपनीने क्रुड अनुकूलतेसाठी के मॉडेल आणि क्रुडच्या जलद व अचूक परीक्षणासाठी बीपीएमएआरआरके हे नवीन तंत्रज्ञान विकसित केली आहेत. तेल आणि वायू क्षेत्रात हा विक्रमी टप्पा पार करणारी बीपीसीएल ही जागतिक पातळीवरची एकमेव कंपनी ठरली आहे. कंपनीने नुकताच रिफायनरी सॉफ्टवेयर व्यवसायातील जागतिक आघाडीची कंपनी मेसर्स अस्पेन टेक्नॉलॉजी इंक, युएसएबरोबर सहकार्य करार केला आहे. त्याद्वारे रिफायनरी क्षेत्राला रियल टाइम मॉनिटरिंग आणि रिफायनरी युनिट्सचा परिपूर्ण वापर तसेच बीपीएमएआरआरके सॉफ्टवेयरचा पुरवठा इत्यादी सुविधा दिल्या जाणार आहेत.

वायू क्षेत्रातील भारताचे आयातीवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी बीपीसीएल- आर अँड डी उर्जा कार्यक्षम पीएनजी बर्नर विकसित करत आहे. सध्या देशाच्या ४४ एमएमटीपीएपैकी ४० टक्के मागणी आयातीतून पूर्ण केली जाते. आर अँड डीने यशस्वीपणे पीएनजी बर्नर तयार केला असून त्याची कार्यक्षमता ७० टक्के आहे. आर्थिक वर्ष २०२३- २४ मध्ये उर्जा कार्यक्षम पीएनजी स्टोव आणण्याचे आणि पायलट आयोजित करण्याची योजना आहे. त्याद्वारे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे ध्येय आहे.

या उद्योन्मुख क्षेत्रात आम्ही मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांच्या स्वरुपात मोठी गुंतवणूक करत आहोत. या नाविन्यपूर्णतेमुळे बीपीसीएलला स्पर्धेत आघाडीचे स्थान मिळेल तसेच शाश्वत व्यावसायिक वातावरण तयार करता येईल. हे करत असतानाच देशाच्या शून्य उत्सर्जन मोहिमेसाठी योगदान देणे आणि आगामी पिढ्यांसाठी हे जग अधिक सुखकर करणे शक्य होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here