वेंगुर्ला प्रतिनिधी– येथील रा.कृ.पाटकरमधील इयत्ता दहावी सन १९८४च्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल ३९ वर्षांनी स्नेहसंमेलन संपन्न झाले. वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र येथे पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी १०५ माजी विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थिती दर्शवित हे स्नेहसंमेलन यादगार केले. तसेच विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी केलेला ड्रेसकोड कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. https://sindhudurgsamachar.in/kokan-कवी-लेखकांनी-आपले-विचार/
सुरुवातीला आपल्या सोबतच्या दिवंगत विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी आपापला परिचय करुन देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शैलेश जामदार आणि अनिता आरोंदेकर यांचा गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान मसुरकर, शिरीष कोरगांवकर व अभय आरोंदेकर यांनी केले. या स्नेहमेळाव्याच्या नियोजनासाठी जॉन्सन डिसोजा, शिरिष कोरगांवकर, बाळा शिरसाट, प्रसाद महाले, स्वाती प्रभू, शहनाज शेख, नितीन सावंत, अॅड.जी.जी.टांककर, भगवान मसुरकर, जाफर शेख, जयंत भाटीया, उमेश चव्हाण, मनोज आरोसकर, भूषण नाबर व पोलिस उपनिरिक्षक मोहन चव्हाण यांनी मेहनत घेतली.
फोटोओळी – रा.कृ.पाटकरमधील इयत्ता दहावी सन १९८४ च्या माजी विद्यार्थ्यांचे तब्बल ३९ वर्षांनी स्नेहसंमेलन पार पडले.