वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर व्हि.जी.फिटनेसतर्फे आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. https://sindhudurgsamachar.in/kokan-तब्बल-३९-वर्षांनी-आठवणीं/
अडथळा शर्यत व १०० किलोमिटर धावणे या स्पर्धांमध्ये विरा तारी, रेयांष पाटील, पुनित माने, मयुरी परब, काना परब, ईशान वडियार, ईशा कुबल, ओम पडते, गार्गी पेडणेकर, वेदश्री रेडकर, शुभ्रा नागवेकर, आर्या सरमळकर, अंजली करंगुटकर, सारा बागवे, शौर्य मांजरेकर, देवेन वडियार, सर्वेश परब, भाग्येश रांजणकर, चिन्मय कुडपकर, आराध्य प्रभूसाळगांवकर यांनी यश पटकाविले. विशेष म्हणजे पालकांनी सुद्धा या क्रिडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी योगेश नाईक, उमेश पाटील, श्रीकांत गावडे, प्रसाद परब, अनिकेत ताम्हणकर, योगेश राऊळ, सुरेंद्र चव्हाण, सुभाष तोडकर, सूर्यकांत कावले, जयराम वायंगणकर, विकास सावळ, सोनाली चेंदवणकर, रुपाली दाभोलकर, स्वाती गावडे, सानिका सरमळकर आदींनी सहकार्य केले. बक्षिस वितरण कार्यक्रमावेळी सर्व पालक, विद्यार्थी व व्हि.जी.फिटनेसचे संचालक वासुदेव गावडे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रतिराज कुडपकर यांनी मानले.
फोटोओळी – व्हि.जी.फिटनेसतर्फे घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.