खेड- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीनजीक माळवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सायंकाळी ४.३० केलेल्या कारवाईत एका घरातून लाखो रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वाय. एम. पवार विभागीय उपआयुक्त कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली २४ रोजी खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहती नजीक लोटे माळवाडी येथे राहणारा निहार हेमंत वारणकर याच्या घरातील एका बंदिस्त खोलीत अवैध गोवा राज्य बनावटीचा विदेशी मद्याचा साठा सायंकाळी ४.३० वा. जप्त केला.
या कारवाईत अवैध गोवा बनावटीच्या मद्य साठ्यात २८ बॉक्समध्ये सुमारे १ लाख ६४ हजार ४००रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. या मुद्यमालाच मालक निहार हेमंत वारणकर (रा. लोटे माळवाडी ता. खेड जि. रत्नागिरी )यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.