मुंबई- प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलात नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे संस्थापक मुंबईचे माजी महापौर,माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांच्या स्मरणार्थ मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना व प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय श्रेणी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकणातील-गणेशोत्सवासाठ/
याचे निकाल खालीलप्रमाणे –
पुरुष गट ,उपांत्य फेरी – संदीप दिवे विरुद्ध जावेद शेख. २५-०, २५-९
मोहम्मद यासिन शेख विरुद्ध सज्जाद शेख. २५-५,२५-१३
अंतिम फेरी – संदीप दिवे वि. वि. मोहम्मद यासिन शेख. २५-१३, २५-२४
महिला गट, अंतिम फेरी – प्राजक्ता नारायणकर विजयी विरुद्ध मालती केलकर
एकूण विजयी पुरुष गट –
संदीप दिवे, मोहम्मद यासिन शेख, सज्जाद शेख, अहमद अली सैय्यद, जितेश कदम, शहानवाज शेख, मुकेश शर्मा
महिला गट
प्राजक्ता नारायणकर, मालती केलकर, अनिता नायक, जयमाला परब
ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता ठाकरे क्रिडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू , सचिव डॉ. मोहन राणें,विश्वस्त राजू रावळ,विश्वस्त मकरंद येडुरकर व कॅरम संघटनेचे अध्यक्ष विजय राऊत व सचिव इक्बाल नाबी तसेच संकुलाचे कर्मचारी याचे मोलाचे सहकार्य लाभले.