बुधवारी १४८७ रुग्णांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असुन १३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तरीही रुग्ण संक्रमणाचा दर हा ३२ % आहे आणि रुग्ण बरे होण्याचा रेट हा ४४% असून ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे .आतापर्यंत गोव्यामध्ये कोरोनामुळे २५०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या आठवड्यापासून सुमारे २०० रुग्ण दाखल होण्यास येत आहेत .हा आकडा कमी असला तरी रुग्णालयात दाखल होण्यास लोक वेळ लावत असल्यामुळे ते अस्वस्थ झाल्यावरच रुग्णालयात येत आहेत तर काही रुग्णालयात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू होत आहे.
म्हापसाच्या रुग्णालयातील ८ मृतांमध्ये सगळ्यात लहान मृताचे वय ३० असून याला दुसरा कोणताही आजार नव्हता तर या सर्वांना गृह विलगीकरणात ठेवले होते आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.इतर रुग्ण हे ४५ वर्षांच्या आतील होते आणि प्रत्येकाला इतरही आजार होते.
गोव्यात आता १० दिवस लसीकरण उत्सव होत आहे पण यासाठी नागरिक उत्साही आहेत असे दिसून येत नाही आहे.दिवसभरात ६४०२ लोकांनी लसीकरण घेतले आणि फक्त ३४ लोकांचे दोन्ही डोसचे लसीकरण झाले आहे.दिवसभरात जास्तीत जास्त ३०००-३५०० लोकांचे टिकाकरण व्हावे असा अंदाज आहे.१८-४४ वयोगटातील लोक टिकाकरणासाठी उत्साहाने येत आहेत असे दिसून आले.
कॉन्डोलिम प्राथमिक आरोग्य केंद्रात एका ९७ वर्षीय नागरिकाला त्यांच्या गाडीतच लसीकरण देण्यात आले.अश्या काही वेगळ्या कल्पना अवलंबिल्या तर लसीकरणाला येणाऱ्या लोकांना सुद्धा मिळाल्यामुळे त्याचे प्रमाणही वाढेल असे आरोग्यमंत्री विश्वजित राणेयांनी सांगितले.