वेंगुर्ला प्रतिनिधी- दहावी परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातून प्रथम आलेली उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी प्रतिक्षा नाईक हिचा वेंगुर्ला भाजपातर्फे परबवाडा – कणकेवाडी येथील तिच्या निवासस्थानी जाऊन तिचा सत्कार केला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-फलंदाजी-आणि-गोलंदाजी/
कु. प्रतिक्षा हिला परबवाडा सरपंच शमिका बांदेकर व भाजपा तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस यच्या हस्ते शाल व भेटवस्तू देण्यात आली. तसेच प्रतिक्षाची आई पौर्णिमा नाईक हिचाही सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, पपू परब, हेमंत गावडे, सारिका काळसेकर, सुहिता हळदणकर, स्वरा देसाई, योगिता नाईक, डॉ.बाळू गवंडे, चेतन देसाई, शैलेश बांदेकर व भारती नाईक उपस्थित होते.
फोटोओळी – प्रतिक्षा नाईक हिला शमिका बांदेकर व मनवेल फर्नांडीस यच्या हस्ते शाल व भेटवस्तू देण्यात आली.


