Maharashtra: बीपीसीएल एफआयपीआय तेल आणि वायू पुरस्कार २०२२ मध्ये पाच प्रतिष्ठित पुरस्कारांसह चमकले

0
76
BPCL,FIPI,
बीपीसीएल एफआयपीआय तेल आणि वायू पुरस्कार २०२२ मध्ये पाच प्रतिष्ठित पुरस्कारांसह चमकले

मुंबई: एक अग्रगण्य ‘महारत्न’ आणि फॉर्च्यून ग्लोबल ५००  कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ला एफआयपीआय तेल आणि वायू पुरस्कार २०२२ (FIPI Oil & Gas Awards 2022) मध्ये पाच प्रतिष्ठित पुरस्कारांसह सन्मानित केले गेले. पुरस्कारांचे वितरण भारत सरकारचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री आणि गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री माननीय श्री. हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते नुकतेच एक भव्य समारंभात झाले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-उन्हाळ्यात-ग्राहकांच्/

     एफआयपीआय तेल आणि वायू पुरस्कार (FIPI Oil & Gas Awards) हे उद्योगाच्या उल्लेखनीय कामगिरीचा पुरावा आहेत आणि अनुकरणीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी ते एक व्यासपीठ म्हणून काम करते. बीपीसीएलची कल्पकता, ग्राहक केंद्रित उपक्रम आणि कामकाजातील उत्तम गुणवत्तेबद्धलची वचनबद्धता यावर प्रकाश टाकत त्यांची उत्कृष्ट कामगिरी आणि उत्कृष्टतेबाबतचे समर्पण अनेक पुरस्कार श्रेणींमध्ये ओळखले गेले.

    बीपीसीएलला मिळालेल्या पाच पुरस्कारांमध्ये हे समाविष्ट आहे:

·        या वर्षीची सर्वोत्कृष्ट तेल वितरण कंपनी (ऑइल मार्केटिंग कंपनी ऑफ द इयर:

बीपीसीएलला बाजाराच्या विस्तारात आणि थेट व किरकोळ या दोन्ही प्रकारच्या विक्रीच्या बाबतीत अपवादा‍त्मक कामगिरीसाठी या वर्षीची सर्वोत्कृष्ट तेल वितरण कंपनी (ऑइल मार्केटिंग कंपनी ऑफ द इयर) म्हणून मान्यता मिळाली. हा पुरस्कार बीपीसीएलच्या अशा ग्राहककेंद्रित उपक्रमांना पोच पावती देतो ज्यामुळे उद्योगातील वाढ आणि यशाला चालना मिळाली आहे. 

·        ९ एमएमटीपीए आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेची या वर्षीची सर्वोत्कृष्ट रिफायनरी (रिफायनरी ऑफ द इयर):

कोची रिफायनरी- बीपीसीएलचे एक यूनिट, कोची रिफायनरीला ९ एमएमटीपीए (प्रति वर्ष ९ दशलक्ष मेट्रिक टन्स) आणि त्यापेक्षा जास्त  क्षमता असलेल्या रिफायनरींच्या श्रेणीमध्ये या वर्षीची सर्वोत्कृष्ट रिफायनरी (रिफायनरी ऑफ द इयर) म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार कोची रिफायनरीच्या वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीचा दाखला आहे.

·        ९ एमएमटीपीएपेक्षा कमी क्षमतेची या वर्षीची सर्वोत्कृष्ट रिफायनरी (रिफायनरी ऑफ द इयर):

बिना रिफायनरी- बीपीसीएलचे आणखी एक यूनिट, बिना रिफायनरीला ९ एमएमटीपीए (प्रति वर्ष ९ दशलक्ष मेट्रिक टन्स) पेक्षा कमी क्षमता असलेल्या रिफायनरींच्या श्रेणीमध्ये या वर्षीची सर्वोत्कृष्ट रिफायनरी(रिफायनरी ऑफ द इयर) म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. बिना रिफायनरीच्या कार्यक्षमता, उत्पादन, ऊर्जा संवर्धन, आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरणीय मानकांचे पालन यामधील महत्त्वपूर्ण कामगिरीवर या पुरस्काराने प्रकाश टाकला आहे.

·        डिजिटल पद्धतींमध्ये या वर्षीची सर्वोत्कृष्ट प्रगत कंपनी (डिजिटली अॅडव्हान्स्ड कंपनी ऑफ द इयर) (विशेष प्रशंसा):

डिजिटल पद्धतींमध्ये प्रगत कंपनी म्हणूनबीपीसीएलचे विशेष कौतुक केले गेले आहे. हा सन्मान कंपनीची सोशलमीडियावरील यशस्वी आणि लक्षणीय उपस्थिती, ग्राहक सेवेतील उत्कृष्टता व विविध डिजिटल मोहिमांच्या यशस्वितेची पावती आहे.

·        या वर्षीची सर्वोत्कृष्ट नवकल्पक कंपनी (इनोव्हेटर ऑफ द इयर):

रिफायनरी ऑफ-गॅसेस तंत्रज्ञानातून एच२ रिकव्हरीसाठी कॉर्पोरेट संशोधन आणि विकसन सायटेशन – बीपीसीएलच्या कॉर्पोरेट संशोधन आणि विकसन टीमला रिफायनरी ऑफ-गॅसेस तंत्रज्ञानातून एच२ रिकव्हरीवरील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी या वर्षीची सर्वोत्कृष्ट नवकल्पक कंपनी (इनोव्हेटर ऑफ द इयर) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठित पुरस्कार टीमची कल्पकता, अस्सलपणा, उपयोगिता, मूल्य आणि पुन्हा प्रतिकृती करता येण्याची क्षमता यांचा सन्मान करते. या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या यशात मोलाचा वाटा असलेल्या चैतन्यपूर्ण टीमचे संशोधन आणि विकसन विभागाचे व्यवस्थापक श्री. नितीन सोमकुवर यांनी नेतृत्व केले होते.

बीपीसीएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. जी. कृष्णकुमार याबाबत म्हणाले, “एफआयपीआय तेल आणि वायू पुरस्कार २०२२ (FIPI Oil & Gas Awards 2022) मध्ये मिळालेला हा सन्मान नावीन्य, उत्कृष्टता, गुणवत्ता आणि ग्राहक सेवेसाठी आमच्या निरंतर प्रयत्नांचा पुरावा आहे. ज्यांनी कामगिरी, कार्यक्षमता आणि विपणन कौशल्य यामध्ये उद्योग क्षेत्रात असे मानक तयार केले आहेत, जे आमचे ग्राहक, उद्योग क्षेत्रातील अन्य उद्योजक, नियामक आणि सरकारी संस्थानद्वारेसुद्धा मानले गेले, अशा आमच्या बीपीसीएल कुटूंबाच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे.

    एफआयपीआय तेल आणि वायू पुरस्कार (FIPI Oil & Gas Awards) उद्योग क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक, अग्रणी आणि नवकल्पकांचे क्षेत्रातील अपवादा‍त्मक योगदान आणि यश ओळखून त्यांचा सन्मान करतात. तेल आणि वायू क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या सन्मामनीय पुरस्कार समितीद्वारे पुरस्कारांचे मूल्यमापन करण्यात आले.

एफआयपीआय तेल आणि वायू पुरस्कार २०२२ (FIPI Oil & Gas Awards 2022) मध्ये बीपीसीएल ची अपवादा‍त्मक कामगिरी ऊर्जा क्षेत्रातील एक चैतन्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण संस्था म्हणून तिचे स्थान अजून जास्त मजबूत करते. बीपीसीएलच्यावतीने बीपीसीएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. जी. कृष्णकुमा, मार्केटिंग विभागाचे संचालक श्री. सुखमल जैन आणि रिफायनरिजचे संचालक श्री. संजय खन्ना आणि कंपनीचे काही अन्य वरिष्ठ यांनी हे पुरस्कार स्वीकारले. याशिवाय,  श्री. पी. एस. रवी, श्री. संतोष कुमार, श्री. डी. व्ही ममदापुर, श्री. एस जेना, श्री. अभय भंडारी, श्री. चाको जोस, श्री. अब्बास अख्तर, श्री. रवीकुमार व्ही. यांच्या खास उपस्थितीने बीपीसीएलच्या संपूर्ण संघाच्या समर्पणाचे व सामूहिक प्रयत्नांचे उदाहरण दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here