आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा उत्साह वाढविणाऱ्या आहेत.
आमदार दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित जिल्ह्यात सर्वत्र विविध उपक्रम आयोजित केले होते. पण अधिवेशन असल्याने ते या सर्व कार्यक्रमांना अनुपस्थित राहिले.त्याबद्दल त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. https://sindhudurgsamachar.in/kokan-गणेशोत्सवात-१३-सप्टेंबर/
‘आपण सर्वांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांसाठी मी उपस्थित राहू शकलो नाही, त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करत त्यांनी ‘ माझ्या अनुपस्थितीमध्ये आपण हाती घेतलेले उपक्रम योग्यपणे राबवत आहात याबदल तुम्हा सर्वांचे मनापासून कौतुक. वाढदिवसानिमित वेगवेगळे सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत. सहा दिवसांचे आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. त्यासाठी सर्व आयोजकांचे, शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आणि मित्रमंडळींचे मी मनापासून आभार मानतो’ असे सांगितले.
आपल्या सर्वांची सोबत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे प्रेम माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. माझ्यावरील आपले प्रेम आणि विश्वास असाच वाढत राहो अशी प्रार्थना. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद.


