देश-विदेश – चंद्रयान-३ हे २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडिंग होण्याची शक्यता

0
31
चांद्रयान-३ हे २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडिंग होण्याची शक्यता

बेंगलोर- भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम असलेल्या चंद्रयान-३ चे १४ जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. सध्या चंद्रयान हे पृथ्वीच्या भोवती फिरत आहे. यात ते टप्प्या-टप्प्याने पृथ्वीपासून दूर जाईल. पृथ्वीभोवती पाच फेऱ्या झाल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल. आज या चंद्रयानाचे तिसरे ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी झाले

चंद्रयान लाँच केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या यानाने पृथ्वीभोवती पहिली फेरी पूर्ण केली होती. यावेळी पहिले अर्थ-बाऊंड ऑर्बिट रेझिंग मॅन्यूव्हर यशस्वीपणे पार पडलं होतं. त्यानंतर १७ जुलै रोजी दुसरं ऑर्बिट रेझिंग मॅन्यूव्हर पार पाडण्यात आलं. यानंतर हे यान पृथ्वीपासून ४१,६०३ बाय २२६ किलोमीटर या कक्षेमध्ये पोहोचलं होतं. यानंतर आज चंद्रयान-३ पुन्हा पुढच्या कक्षेत ढकलण्यात आलं.

चंद्रयान-३ मोहीमेचे सगळे टप्पे वेळेवर पार पडत आहेत. आता याच कक्षेत पृथ्वीची प्रदक्षिणा घातल्यानंतर ते पुन्हा २० जुलै रोजी पुढच्या कक्षेत ढकलण्यात येईल. अशा प्रकारे ३१ जुलैपर्यंत ते पृथ्वीपासून १ लाख किलोमीटर दूरच्या कक्षेत पोहोचवण्याचं इस्रोचं उद्दिष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here