भाजपच्या ‘सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी’ प्रभाकर सावंत यांची निवड
सिंधुदुर्ग :- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले श्री. प्रभाकर सावंत यांची भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष”पदी”निवड करण्यात आली आहे.ही निवड प्रदेश स्तरावरून करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-चंद्रयान-३-हे-२३/
विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रभाकर सावंत यांना संधी देण्यात आली आहे.या पदासाठी महेश सारंग,प्रकाश मोर्ये यांच्यासह अनेकजण इच्छुक होते.मात्र त्या ठिकाणी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या श्री.प्रभाकर सावंत यांना संधी देण्यात आले आहे.यापूर्वी ते जिल्हा संघटना या पदावर कार्यरत होते.



