वाढीव नुकसान भरपाई देण्याची संतोष मोर्यें यांची मागणी.._
दोडामार्ग,ता.१९-: मोर्ले येथे हत्तीने शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्याने केळी, फणस, भेडले माड यांचे नुकसान केले. विद्युत तारा तुटून रस्त्यात पडल्याने वस्तीची केर मोर्ले दोडामार्ग एसटी अर्धा तास थांबून राहिल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.नंतर अजित गवस,संतोष चिरमुरे, उमेश चिरमुरे,नारायण गवस,प्रकाश कांबळी आदींनी भेडले माड तोडून रस्ता मोकळा केला आणि वाहतूक पूर्ववत झाली. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-चंद्रयान-३-हे-२३/


