Sindhudurg : आंदुर्ले गावातील तलठी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची, महसुली संबंधित कामे प्रलंबीत

0
61
महसूल
आंदुर्ले गावातील तलठी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची, महसुली संबंधित कामे प्रलंबीत

आंदुर्ले –गावाकरिता स्वतंत्र नियुक्त करण्यात आलेल्या सजा- तलाठी यांनी अजुन आपला पदभार स्विकारलेला नाही. त्यामुळे आंदुर्ले गावातील ग्रामस्थांना सात -बारा , वारस तपास, महसुली संबंधित कामे प्रलंबीत आहेत.

मागील अनेक महिन्यांपासून महसूल कामांकरिता आंदुर्ले ग्रामस्थांना कुडाळ तालुक्याच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे
या बाबत आंदुर्ले गावचे सुपूत्र सामाजिक कार्येकर्ते अॅड.आनंद परब यांनी पाठपुरावा केला असता मिळालेल्या माहीती नुसार अजून कार्यालयीन आदेश प्राप्त न झाल्यामुळे नियुक्त केलेल्या नव्या तलाठी यांनी पदभार अद्याप स्विकारलेला नाही त्यामुळे ग्रामस्थांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. असे समजते तरी संबंधीत खात्याने यावर लवकर आदेश देण्यात देवून ग्रामस्थाना
त्रासमुक्त करावे अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा ईशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here