आ. वैभव नाईक यांनी निवड जाहीर करत दिल्या शुभेच्छा
प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
कुडाळ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रांगणा तुळसुली शाखाप्रमुख पदी अमर उर्फ धाकू परब यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी ही निवड जाहीर करत श्री. परब यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आंदुर्ले-गावातील-तलठी-उ/
यावेळी रांगणा तुळसुली येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, वेताळ बांबर्डे विभागप्रमुख नरेंद्र राणे, उपविभागप्रमुख प्रदीप गावडे, दाजी आईर, कानू शेळके, धनंजय घाडी यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


