कृषी महाविद्यालय दापोलीच्या कृषी सह्याद्री गटाने सादर केले प्रात्यक्षिक.
प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
माणगाव, कुडाळ – ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत कृषि महाविद्यालय, दापोलीच्या कृषी सह्याद्री या गटाने कोकण कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या SRI (system of Rice intensification) पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले. या पद्धतीमध्ये दोन रोपांमधले अंतर २५ सेमी x २५ सेमी असल्याने मुळांना इजा होत नाही, तसेच पुनरलागवडीत उत्पन्नात होणारी प्रचंड घट कमी करता येते तसेच फुटव्यांची आणि लोंब्यांची संख्या वाढते व उत्पन्नामध्ये १५ ते २० टक्के वाढ होते असे अनेक फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. विद्यापीठाच्या तंत्रज्ञानावर आणि शेतकऱ्यांच्या भात लावणीत येणाऱ्या समस्या या विषयावर शेतकरी आणि विदयार्थ्यांमध्ये चर्चा झाली. https://sindhudurgsamachar.in/kokan-सर्जेकोट-पिरावाडी-येथे-ध/



कृषी सह्याद्री गटाच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. विठ्ठल नाईक, केंद्रप्रमुख डॉ. संदिप गुरव, कार्यक्रमाधिकारी डॉ. रणजित देव्हारे, विषय विशेषज्ञ डॉ. विरेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तसेच माणगाव मधील प्रगतशील शेतकरी श्री जयंत कुबल, श्री चेतन नार्वेकर आणि ग्रामपंचायत माणगाव यांनी उत्कृष्ट सहकार्य केले.


