
कणकवली I प्रतिनिधी
कणकवली: अलीकडेच आपण देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून “आजादी का अमृत महोत्सव साजरा केला. या अमृतमहोत्सवी वर्षानंतर पहिल्यांदाच एक आदिवासी स्त्री भारतीय संविधानानुसार सर्वोच्च पदी विराजमान झालेली आहे. परंतु दुसरीकडे मणिपूर राज्यात आदिवासी स्त्रियांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर झुंडीने लैंगिक अत्याचार केले जात आहेत . या झुंडीला अडवणाऱ्या तिच्या भावाला ठार मारले गेले आणि त्या अमानवी घटनेचे व्हिडिओ प्रसार माध्यमांवर फिरवण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-माणगाव-मध्ये-कोकण-कृषी-वि/
या घटनेला दोन महिने उलटूनही आरोपीवर तेथील कायदा आणि सुव्यवस्था पाहणाऱ्या शासकिय यंत्रणेने गुन्हेगारांवर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. भारतीय समाज व्यवस्था जातपितृसत्ताक असल्यामुळे सर्वच उच्च जातीय दलित-आदिवासी आणि स्त्रियांवर अन्याय अत्याचार करत आलेले आहेत. महाराष्ट्र हे फुले-शाहू-आंबेडकरांची परंपरा असलेले राज्य आहे. महाराष्ट्राने या देशाला डॉ.आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारताला एक समर्थ आणि सक्षम संविधान दिले.
सविधानामध्ये एकूणच सर्व नागरिकांना स्वातंत्र्य- समता बंधुता याची हमी देण्यात आली आणि दलित-आदिवासी आणि स्त्रिया यांच्या हक्क अधिकार यासंदर्भात विशेष अधिकार देण्याची तरतूद केली मात्र त्या अधिकारांची दररोज पायमल्ली सरकारी यंत्रणेकडूनच होत आहे. मणिपूर राज्यातील हिंसाचाराला आतापर्यंत दोन महिने उलटून गेलेले आहेत. संसदेचे अधिवेशन सुरु आहे परंतु त्यावर सरकार कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाहीय. आम्ही सत्यशोधक विद्यार्थी संघटना या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत. केंद्र सरकारने याची गंभीर दाखल घेऊन आरोपिंना तात्काळ अटक करून त्यांना तात्काळ कठोर शिक्षा करण्यात यावी असे निवेदन सत्यशोधक विद्यार्थी संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष सुजय जाधव व सुधांशु तांबे, राहुल कदम तन्मय कदम प्रांताधिकारी कणकवली यांना आज देण्यात आले.

