Maharashtra: महिला अत्याचार निषेधाच्या मुंबईतील मुक मोर्चात आमदार वैभव नाईक सहभागी!

0
135
महिला अत्याचार निषेधाच्या मुंबईतील मुक मोर्चात आमदार वैभव नाईक सहभागी!
महिला अत्याचार निषेधाच्या मुंबईतील मुक मोर्चात आमदार वैभव नाईक सहभागी!

मंत्रालया जवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ केला सरकारचा निषेध

जनताच सरकारला जागा दाखवेल!

मुंबई : मणिपूर सह देशभरात झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तसेच युवती सेनेच्या माध्यमातून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी उद्यानात मूक मोर्चा काढत या घटनांचा निषेध केला. तसेच केंद्र शासनाच्या विरोधात याप्रसंगी तीव्र भावना देखील व्यक्त केल्या.

या मूक मोर्चा मध्ये कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी देखील सहभाग घेत महिलांवरील अत्याचाराचा निषेध केला. तसेच शासनाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. या केंद्र शासना कडून मदतीची काय अपेक्षा करणार? असा सवाल नाईक यांनी केला. याप्रसंगी ठाकरे गटाचे आमदार, युवतीसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ceat-लिमिटेडतर्फे-भारतातून/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here