Kokan: वस्तीची एसटी बस घेवून घोगरे येथे गेलेल्या कंडक्टरला सापाचा दंश

0
64
वस्तीची एसटी बस घेवून घोगरे येथे गेलेल्या कंडक्टरला सापाचा दंश
वस्तीची एसटी बस घेवून घोगरे येथे गेलेल्या कंडक्टरला सापाचा दंश

वस्तीला जाणाऱ्या चालक वाहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत

खेड (प्रतिनिधी) : खेड बसस्थानकातून एसटी बस घेवून ग्रामीण भागात वस्तीला गेलेल्या एका वाहकास विषारी सापाने दंश केल्याची घटना घडली आहे. चालकाने प्रसंगावधान राखत बसमधूनच वाहकास तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळेत मिळालेल्या उपचारामुळे मोठा धोका टळला. या प्रकाराने ग्रामीण भागात वस्तीला जाणाऱ्या चालक वाहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-अनोख्या-उपक्रमाने-केला-व/

तालुक्यातील घोगरे येथे वस्तीची बसफेरी घेवून गेलेल्या वाहक ए. आर. मेहरकर यांना पहाटे ३ च्या सुमारास विषारी सापाने दंश केला ग्रामीण भागात रूग्णवाहिका उपलब्ध होण्यास विलंब होणार होता. ही बाब लक्षात आल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत उपचार मिळवण्यासाठी बसमधूनच वाहकास कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू झाले त्यामुळे त्याच्या प्रकृतीचा टळला धोका टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here