कुडाळ- कवठी येथे नागरिक बहुउद्देशीय संस्था नेरूर चे अध्यक्ष श्री अनिल गावडे यांचे उपस्थितीत पंधरावा वित्तआयोग २०२१/२०२२ च्या अनुषंघाने कवठी गावातील बचत गटाच्या महीलांसाठी ग्रामपंचायत कवठी येथे व विविध प्रकारचे मसाले बनविण्याचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात पंधराव्या वित्त आयोगातील तरतुदीनुसार एकूण २३ महीला बचत गटातील महिलांना मसाला बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-नोकरीचे-प्रलोभन-दाखवून-त/
प्रशिक्षक सौ.मनाली कुडाळकर यांनी बचत गटाच्या महीलांना मसाले बनविण्याचे प्रशिक्षण दिले .यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच स्वाती करलकर ग्रामपंचायत सदस्य सौ स्वाती सदानंद राणे सविता बांदेकर ग्राम संघाचे अध्यक्ष माया मोहन वाड्येकर तसेच सचिव साक्षी जोशी तसेच सि आर पी ताई तसेच ग्रामसेवक सतीश साळगावकर इतर महिला आणि ग्रामपंचायत कवठीच्या डाटा ऑपरेटर मनीषा धुमाळ आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.


