दापोली– पर्यावरणाचा समतोल टिकून राहण्यासाठी वृक्षराजी वाढविणे व वृक्षसंवर्धन करणे हाच महत्वाचा उपाय आहे. वृक्ष संवर्धनाचे महत्त्व ओळखून दापोली तालुक्यातील जि.प. आदर्श शाळा चंद्रनगर च्या विद्यार्थ्यांनी शालेय आवारात व बागेत वृक्षारोपण करून ‘ झाडे लावूया ‘ उपक्रमाचा जागर केला.https://sindhudurgsamachar.in/kokan-ग्रामपंचायत-कवठी-येथे-मह/
प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून ‘ झाडे लावूया ‘ या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. गुलाब, जास्वंद, तगर, अनंत, कन्हेरी, सदाफुली, यांसारख्या फुलझाडांचे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शालेय बागेत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण केले. याशिवाय यंदाच्या तृणधान्य वर्षाचे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांनी शालेय परसात नाचणीचीही लागवड केली. नाचणीची पारंपारिक पद्धतीने लावणी कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन शाळेतील शिक्षक अर्चना सावंत, बाबू घाडीगांवकर, मनोज वेदक, मानसी सावंत यांनी केले. प्रत्यक्ष परसात राबून नाचणीची लावणी करताना व झाडे लावताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेती केल्याचा आनंद मिळाला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण व सर्व सदस्यांनी, पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.


