Kokan: स्व:संरक्षण करता येणे मुलीसाठी काळाची गरज -डाॅ.मोरजकर

0
86
स्व:संरक्षण करता येणे मुलीसाठी काळाची गरज -डाॅ.मोरजकर
स्व:संरक्षण करता येणे मुलीसाठी काळाची गरज -डाॅ.मोरजकर

दोडामार्ग / सुमित दळवी
महिला बालविकास विभाग,आयोजित,राजमाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज सायन्स,कुडासे प्रशालेत संपन्न झाला यावेळी पंचायत समिती दोडामार्ग CDPO मा.साटम मॅडम,भारतीय स्री संघटना वक्ता दोडामार्ग प्रमुख मा.डाॅ.मोरजकर मॅडम,दोडामार्ग पोलिस स्टेशनचे पी एस आय मा.नाईक साहेब,पोलिस आदिती प्रसादी,निकिता नाईक, महाराष्ट्र थांगता असो.जिल्हा प्रशिक्षक नागेश बांदेकर,अभय केंद्र सावंतवाडी प्रमुख रोहन सैदाणे,प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस.एस.परब मॅडम,जेष्ठ शिक्षक पी.बी.किल्लेदार सर दिपाली पालव मॅडम, क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी सह.प्रशालेतील सर्व विद्यार्थीनी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-चंद्रावर-पहिलं/

यावेळी डाॅ.मोरजकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले फक्त ही ताकद ,हा आत्मविश्वास प्रत्येकीला कमवता यायला हवा . आजच्या जगात प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहे. उच्च पदस्त महिलांना ही बऱ्याचदा पुरुष मक्तेदारीला सामोरे जावे लागते. पण तरीही मुलींना शिकवतांना अगदी मोजकेच पालक असतील की जे स्वतःच्या मुलींना स्वसंरक्षण चे धडे देतात पोलिस नाईक यांनी
सांगितले की, स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे. आज युवतीने स्वतः कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सज्ज असले पाहिजे. कारण या प्रशिक्षणातु स्व आत्मविकास वाढतो म्हणून आशा प्रकराचे प्रशिक्षणे होणे हे आवश्यक आहे. युवतींसाठी यांना उपयुक्त आहे कारण अलीकडील काळात  युवतीवर होणारे अन्याय आत्याचार वाढत आहे. या समाज विघातक घटनांना न घाबरता आपण सक्षमपणे तोंड देण्यासाठी स्वतः स्व प्रशिक्षित असणे गरजे आहे, 

आज मुली मुलांच्या बरोबरीने‎ खांद्याला खांदा लावून काम करीत‎ असल्या, तरी सोशल मीडियाच्या‎ अतिरेकामुळे मुलींवर अत्याचार व‎ अन्याय होताना दिसतो. हे‎ टाळण्यासाठी मुलींनी शारीरिक,‎मानसिक , भावनिक आरोग्याच्या‎ विकासातून निर्भयतेकडे वाटचाल‎ करावी. स्वसंरक्षण करता येणे, ही‎ मुलींसाठी काळाची गरज बनली‎ असल्याचे प्रतिपादन पोलिस आदिती प्रसादी यांनी व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी तर प्रस्तावना मा.साटम मॅडम व आभार पी.बी.किल्लेदार यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here