स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी कागदपत्रांची तयारी सुरू ठेवावी!जनहितार्थ प्रकाशित संस्थेचे आवाहन

0
21
स्थानिक स्वराज्य संस्था,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी कागदपत्रांची तयारी सुरू ठेवावी!

प्रतिनिधी विशेष
निवडणुका — २०२५

निवडणुकीचा हंगाम जवळ येत असताना महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी तातडीने करून ठेवावी, असे आवाहन जनहितार्थ प्रकाशित (In Public Interest) या संस्थेने केले आहे. निवडणुकीदरम्यान अनेक उमेदवारांना कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ही यादी उमेदवारांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. https://sindhudurgsamachar.in/आदिशक्ती-अभियानला-राज्/

संस्थेने प्रसिद्ध केलेल्या यादीत अर्जदारांनी सादर करावयाच्या २५ हून अधिक कागदपत्रांचा समावेश आहे. यात —
अर्जदाराचा पासपोर्ट साईझ फोटो, निवडणूक अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र/वैधता प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, भाडेकरारपत्र, वाहन अथवा मालमत्तेचे कागदपत्र, NOC, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्नी अथवा कुटुंबीयांची माहिती, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास तिचा तपशील, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, तसेच सामाजिक माध्यमांवरील (Facebook, Twitter, Instagram) खात्यांची माहिती अशी विविध आवश्यक कागदपत्रे नमूद करण्यात आली आहेत.

तसेच, उमेदवाराने सरकारी नोकरी केली असल्यास किंवा पती/पत्नी सरकारी सेवेत असल्यास त्याचा तपशील, निवासस्थानावरील कर व भाडे भरल्याची पावती, तसेच गुन्हेगारी नोंद असल्यास पोलीस स्टेशनचा अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जनहितार्थ प्रकाशित संस्था ही सामाजिक व प्रशासकीय पारदर्शकतेसाठी कार्यरत संस्था असून, निवडणुकीतील उमेदवारांसाठी कागदपत्रांची ही यादी “सार्वजनिक हितासाठी” प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान गोंधळ किंवा विलंब टाळण्यासाठी उमेदवारांनी ही कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत, असे संस्थेने आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here