सिंधुदुर्ग – अभिमन्यू वेंगुर्लेकर
कणकवलीतील खाजगी कोविंड केंद्राकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली करून जनतेची लूट होत असल्याच्या चर्चा कणकवलीत चांगल्याच रंगात आल्या असून संबंधित प्रशासनाला सर्व प्रकार माहीत असूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा संताप कणकवलीवासी यांनी व्यक्त केला आहे . कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेचा सिंधुदुर्गाला फारसा फरक पडला नव्हता.
पण 2021 ची कोरोना महामारीची दुसऱ्या लाटेने मात्र सिंधुदुर्गाच्या आरोग्य सेवेचे कोमरडे मोडले. नव्याने उद्भभवलेल्या करोना रोगाच्या दुसऱ्या लाटेच्या पादुर्भावाची झळ जिल्ह्यातील खेड्या पाड्यात पोचली त्यामुळे जिल्ह्यातील बरीच खेडी कोरोना संक्रमित झालीत व यात बऱ्याच रुग्णांचा मृत्यू ही झाला या संक्रमण काळात शासनाने सुरू केलेली विनामोबदला आरोग्यसुविधा रोगांचे प्रमाण वाढत असल्याने अपुरी पडत असल्याचे चिन्ह आहे या अपुऱ्या पडणाऱ्या जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय सेवेचा लाभ या खाजगी कोविड सेंटर ना होत असून याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे म्हटले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात संजीवनी हॉस्पिटल व नागवेकर हॉस्पिटल यांनी नव्याने हॉस्पिटलमध्ये कोवीड सेंटर ( कोरोना उपचार केंद्र ) ही सेवा सुरू केली या खाजगी कोविड केंद्रांमध्ये कोरोना संक्रमित व्यक्ती औषधोपचारासाठी दाखल होत आहेत त्यांच्यावर होत असलेल्या औषध उपचार पद्धतीचा व त्याबाबतीत होणाऱ्या खर्चाचा तसेच बिलाची रक्कम स्वीकारण्याच्या कार्यपद्धतीचा विचार करता शासकीय नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही कोविड सेंटरमध्ये केंद्रशासनाने नेमून दिलेल्या 26/10/.2020. च्या नियमावलीनुसार दरपत्रक कुठेही लावल्याचे दिसून येत नाही. किंबहुना रुग्णालयात प्रवेश केल्यावर रुग्णास करावयास लागणाऱ्या चाचण्यांचा खर्च , औषधोपचाराचा खर्च, डॉक्टरांची फी याचा कोणताही अंदाज अथवा तपशील रूग्णालयात रुग्णास समजून येत नाही. त्यामुळे ज्यावेळी अंतिम बिल रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातात येते या वेळी रुग्ण कुटुंबीयांचे डोळे पांढरे होत आहेत .
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील रुग्णालयात शासकीय नियमांचे काटेकोर पालन होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र या खासगी रुग्णालयात या नियमांची पायमल्ली होत होताना दिसत आहे। विशेष म्हणजे या दोन्ही कोवीड सेंटर केंद्राचा वैद्यकीय खर्चाचा तपशील जास्तीत जास्त तोंडी होत असल्याने रुग्णाच्या बिलात तपशिलवार उल्लेख सापडत नाही. त्यामुळे “दिया किसने लिया किसने, असा खेळ असून या रुग्णांलयानी तशी दक्षता घेतली आहे.त्यामुळे रूग्ण व त्याचे नातेवाईक कोणाकडे दाद मागणार आणि तक्रार कुठे करणार आणि कशी करणार असा यक्षप्रश्न जनतेस पडलाय . या गैरकारभार संदर्भात तक्रारी सारखा मार्ग अवलंब करणे या संकट काळात रूग्णांना कठीन होऊन बसले आहे.
या कोविड केंद्रांचा गैरप्रकार शासनाने नेमून दिलेल्या तालुक्यातील तालुकास्तरीय समिती माननीय निवासी नायब तहसीलदार , तहसील कार्यालय कणकवली, तालुका आरोग्य अधिकारी कणकवली, सहाय्यक अधिकारी पंचायत समिती कणकवली यांना त्यांच्या या काळया कृत्याची कल्पना असूनही जाणून-बुजून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे कणकवलीवासीयांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्री माननीय राजेशजी टोपे पालकमंत्री माननीय उदयजी सामत. सिंधुदुर्ग, माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, माननीय मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग. यांचेकडे या संदर्भात तक्रारी पोहोचल्या असून याची प्रत माननीय निवासी नायब तहसीलदार कणकवली. माननीय तालुका आरोग्य अधिकारी कणकवली तसेच माननीय सहाय्यक अधिकारी पंचायत समिती कणकवली यांना रवाना झाल्याचे कळते.
यात केलेल्या तक्रारी मध्ये दोन्ही कोवीड सेंटरना शासनाने नेमून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना कराव्यात , तसेच रुग्णालयांमध्ये दर पत्रक रुग्णाच्या निदर्शनास येईल असे असावे . तसेच रुग्णालयात मार्फत देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेचा तपशील स्पष्ट रूग्णांना त्याचे नातेवाईक यांना समजेल असा असावा. त्यामुळे या संकट काळात रूग्णांची कोणत्याही प्रकारे आर्थिक लूट होणार नाही. महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या 26/ 10 /2020 च्या अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक रुग्ण सेवेचे रुपये चार हजार. रुपये सहा हजार .रुपये सहा हजार पाचशे. या दराप्रमाणे वैद्यकीय खर्चाचे बिल आकारण्यात यावे. तसेच बिलाचा तपशील रुग्णाला व नातेवाईकांना समजेल असा असावा अशी विनंतीही यात करण्यात आली आहे.