एसटी महामंडळ राज्यभरात इंधन विक्री केंद्र सुरू करणार; कर्मचाऱ्यांच्या थकबाकी वेतनवाढीचे हप्तेही जाहीर

0
28
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या थकबाकी वेतनवाढीचे हप्तेही जाहीर
एसटी महामंडळ राज्यभरात इंधन विक्री केंद्र सुरू करणार

मुंबई : उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याच्या दिशेने राज्य परिवहन महामंडळाने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यभरात एसटी महामंडळाच्या मालकीच्या २५० हून अधिक जागांवर इंधन विक्री केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. https://sindhudurgsamachar.in/आरोग्य-योजनांमध्ये-मोठा/

या नव्या योजनेअंतर्गत या ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे महामंडळाला अतिरिक्त उत्पन्न मिळून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या थकबाकी रकमेच्या वितरणाची प्रक्रिया सुरू केली असल्याचेही स्पष्ट केले आहे. महामंडळाच्या प्रसिद्ध निवेदनानुसार, २०२० ते २०२४ या कालावधीतील थकबाकी रक्कम पाच ते ४८ हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here