Ratnagiri – तळेकांटे रेवळेवाडी डोंगराला भेगा पडून डोगर खचला

0
221
तळेकांटे रेवळेवाडी डोंगराला भेगा पडून डोंगर खचला ग्रामस्थांचे जीव धोक्यात
तळेकांटे रेवळेवाडी डोंगराला भेगा पडून डोंगर खचला ग्रामस्थांचे जीव धोक्यात

डोंगरा वरिल घरांना धोका.. ग्रामस्थ भितीच्या छायेखाली – – सततच्या सुरंगाचे हादरे बसत असल्याने डोंगर बनलाय कमकुवत – – पाहणी करून गेलेल प्रशासन अजूनही निद्रीस्त – –

रत्नागिरी- संगमेश्वर येथील तळेकांटे भागातील रेवळेवाडी डोंगराला भेगा पडून डोगर खचत असल्याने तेथील रहीवाशी भितीच्या छायेखाली वावरत आहेत १०० ते ५०० मीटर लांबीच्या ह्या भेगा असून त्या रूंदावत आहेत. त्यामुळे या डोंगरवस्तीतील घरांना धोका निर्माण झाला आहे. मुळात असलेले कारण न बदलता किंवा त्यावर कोणतीही कारवाई न करता वर्षानुवर्षे राहात असलेले गाव- घर सोडून दुसरीकडे राहण्यास जा असा सल्ला सरकार का आणि कसा देऊ शकते ? सरकारला खडी काढणे हे महत्वाचे वाटते का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-चंद्रनगर-शाळेत-रावे-चे/

प्रशासनाने याची पाहणी केली असली तरी ठोस निर्णय घेण्यास उदासिनताच दाखवली असून फक्त ग्रामस्थांना घर सोडून दुर राहण्यास सांगण्यात आले आहे. पण तेथील ग्रामस्थांनी विचारणा केली आहे घरदार -गुर;वासर सोडून जायच तरी कुठे आणि खायच काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या डोंगराच्या पीयथ्याशी खडी क्रशर आहे येथे जे सुरंग लावून जे धमाके होत आहेत त्या जमिनीला हादरे बसत आहेत आणि हे दिर्घकाळ चालत आले आहे. त्या मुळे डोंगराला तडे जाऊन त्यात पावसाचे पाणी जाउन भेगा रूंदावल्याने डोंगर खचला आहे .

डोगर खचल्याने आंबा ,काजू बागायतीचही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या मुळे क्रशरकंपनीने सुरंग लावण्याचे काम बंद करावे असे क्रशर कंपनीला बजावले असतानाही क्रशर कंपनीने सुरंग लावून डोंगर फोडणे चालूच ठेवल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. यासाठी जिल्हाधिकारी जबाबदार नाहीत का? सरकार या बाबतची कारवाई कधी करणार? जीवितहानी झाल्यावर याची दाखल घेतली जाणार का ?असा खडा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here