मांतग व तत्सम जातींच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण (#आर्टी) संस्था मार्फत राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी जेईई (#JEE) व नीट (#NEET) परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्राची निवड करावी, असे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/19513-2/
जेईई व नीट प्रशिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी आर्टीने प्रसिद्ध केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी करण्यात आली. कागदपत्र पडताळणी पुर्ण केलेल्या उमेदवारांची प्रशिक्षणासाठी अंतिम निवड करण्यात आली असून अशा विद्यार्थ्यांची यादी आर्टीच्या संकेतस्थळावर लावण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी https://cpetp.barti.in/ या संकेतस्थळावर जाऊन १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रशिक्षण केंद्राची निवड करावी. जेईई व नीटसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण, दरमहा ६ हजार रुपये विद्यावेतन, त्याचबरोबर पुस्तकांसाठी वर्षातून एकवेळ पाच हजार रुपये आणि प्रशिक्षण केंद्रांना त्यांचे शुल्क आर्टीच्या वतीने देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी सांगितले.

