Kokan: स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज- श्री विशाल खत्री( आयएएस अधिकारी)

0
114
स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज- श्री विशाल खत्री- आयएएस अधिकारी
स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज- श्री विशाल खत्री- आयएएस अधिकारी

कुङाळ- स्पर्धा परीक्षा विभाग, संत राऊळ महाराज महाविद्यालय, नगरपंचायत कुडाळ व युनिक अकॅडमी, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत राऊळ महाराज महाविद्यालयात ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विशाल खत्री आयएएस अधिकारी हे होते. तसेच मा. अरविंद नातू, मुख्याधिकारी, कुडाळ नगरपंचायत मा. सुरज कांबळे, मुख्याधिकारी, वैभववाडी नगरपंचायत, मा. गीतांजली नाईक, प्रशासकीय अधिकारी, कुडाळ नगरपंचायत हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री दिनेश ताठे, द युनिक अकॅडमी, पुणे, होते या कार्यक्रमात मा. विशाल खात्री, आयएसएस अधिकारी, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी केली पाहिजे, असे सांगितले. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षा व त्यासाठी नेमकी काय तयारी करावी याचेही सखोल असे मार्गदर्शन खात्री यांनी केले.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-तळेकांटे-रेवळेवाडी-डों/

मा. सुरज कांबळे, मुख्याधिकारी वैभववाडी नगरपंचायत, यांनी आपला जीवनप्रवास सांगून स्पर्धा परीक्षेमध्ये कशाप्रकारे यशस्वी होता येते हे अधोरेखित केले. तसेच स्पर्धा परीक्षा ला सामोरे जात असताना कुठ कुठल्या अडचणी विद्यार्थ्यांसमोर येऊ शकतात. व त्या अडचणी कशा सोडवल्या पाहिजे याचे मार्गदर्शन श्री कांबळे यांनी आपल्या मनोगतात केले. मा. श्री. अरविंद नातू, मुख्याधिकारी कुडाळ नगरपंचायत, यांनी आपल्या प्रभावी अशा मनोगतात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची जाणीव निर्माण झाली पाहिजे व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे डोळसपणे व गांभीर्याने बघितले पाहिजे असे नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. श्री. दिनेश ताठे, द युनिक अकॅडमी पुणे, यांनी एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा काय आहेत? त्यांचं महत्त्व काय आहे? तसेच विद्यार्थ्यांनी या परीक्षांची तयारी कशा प्रकारे केली पाहिजे? याचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विविध महापुरुष ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड परिश्रम घेऊन अभ्यास केला व जीवनामध्ये यशस्वी झाले त्यांचे देखील उदाहरण श्री. ताठे यांनी आपल्या भाषणात दिले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे यांनी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी दिल्या पाहिजेत. यासाठी अभ्यास केला पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम पहिली ते बारावी यातील जे काही विषय होते त्या विषयांचा सखोल अभ्यास करावा असे आव्हान केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सचिन कोरलेकर यांनी केले. महाविद्यालयाची माहिती प्राचार्य डॉक्टर व्ही. बी. झोडगे यांनी सांगितली. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारत तुपेरे यांनी केले. स्वागत व पाहुण्यांची ओळख प्राध्यापिका प्रज्ञा सावंत यांनी करून दिली. तसेच या कार्यक्रमाचे आभार डॉ. एन. आर. काळे यांनी केले.

या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वय डॉ. एस. एस. लोखंडे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाला एकूण १६४ विद्यार्थी हजर होते. त्यापैकी बॅरिस्टर नाथ पै या महाविद्यालयातील ४० विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. दैनिक सिंधुदुर्ग समाचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here