सांगली येथे झालेल्या स्पर्धेत ६०-७० किलो वजनी गटात पटकावला द्वितीय क्रमांक
प्रतिनिधी: पांडुशेठ साटम
शिरगाव : शिरगाव येथील शिरगाव हायस्कूल, शिरगावच्या विद्यार्थिनीने क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सांगली येथील शांतीनिकेतन संकुल, माधवनगर येथे आज (दि. ५ नोव्हेंबर २०२५) रोजी संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय ज्युडो स्पर्धेत कुमारी सृष्टी मणिलाल पटेल हिने घवघवीत यश संपादन केले.https://sindhudurgsamachar.in/आदिशक्ती-अभियानला-राज्/
इयत्ता १२ वी मध्ये शिकत असलेल्या सृष्टी पटेल हिने ६० ते ७० किलो वजनी गटामध्ये आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशात तिला मार्गदर्शन करणारे शाळेचे शिक्षक श्री. ए. एम. गर्जे सर यांचा मोलाचा वाटा आहे.
या शानदार यशाबद्दल विद्यार्थिनी सृष्टी पटेल व तिचे मार्गदर्शक शिक्षक श्री. गर्जे सर यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अरुणभाई कार्ले, शाळा समिती चेअरमन श्री. विजयकुमार कदम, मानद अधीक्षक श्री. संदीप साटम, संस्थेचे पदाधिकारी, शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. सृष्टीच्या या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


