
भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकून देशाचं नाव जगभर उज्ज्वल केलं आहे. हा विजय फक्त क्रिकेटमधला नाही, तर प्रत्येक भारतीयासाठीच्या अभिमानाचा क्षण आहे.
आज राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत संघातील खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव तसंच प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा मानधन स्वरूपात सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी आणि सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
महिला क्रिकेट संघानं मनं आणि हृदयं दोन्ही जिंकली आहेत. १९८३ साली श्री. कपिल देव यांनी देशाला मिळवून दिलेलं विश्वविजेतेपद आज आपल्या महिला क्रिकेटपटूंनी नव्या पर्वात नोंदवलं आहे. हा दिवस म्हणजे पुन्हा एकदा दिवाळीचा उत्सवच!
ग्रामीण भागातील अनेक मुलींना या यशानं प्रेरणा मिळेल. योग्य संधी मिळाल्यास त्या देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करू शकतात, याचा मला मनापासून अभिमान आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

