‘महाराष्ट्र प्रदेश महिला’ कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न

0
21
‘महाराष्ट्र प्रदेश महिला’ कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न
‘महाराष्ट्र प्रदेश महिला’ कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न

मुंबईत ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश महिला’ कार्यकारिणीची आढावा बैठक गेल्या दोन दिवसांत पार पडली.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विविध टप्प्यांमध्ये नियोजित ह्या बैठकांमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार सन्मा. सुप्रियाताई सुळे, ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार माननीय फौझिया खान, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री शशिकांतजी शिंदे साहेब, ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला माननीय अ‍ॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर ह्यांनी संघटनात्मक बांधणी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने महिला पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

“काल आज आणि उद्याही खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करणारे आदरणीय शरद पवार साहेबच” असे अ‍ॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर बोलल्या .

ह्या साखळी बैठकांना पक्षाच्या पुणे ग्रामीण व शहर, सांगली ग्रामीण व शहर, सातारा, सोलापूर ग्रामीण व शहर, नागपूर ग्रामीण व शहर, चंद्रपूर ग्रामीण व शहर, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, अहिल्यानगर ग्रामीण व शहर, नाशिक ग्रामीण व शहर, नांदेड ग्रामीण व शहर, हिंगोली ग्रामीण, ठाणे ग्रामीण व शहर तसंच पिंपरी चिंचवड, मालेगाव, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ह्या भागांतील ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या महिला पदाधिकारी आवर्जून उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here