तील डोंगरकडा गावात बोलताना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला की, साऱ्या जगाचं पोषण करणारा बळीराजा सरकारच्या दगाबाजीमुळे हाल सोसत असेल, तर त्याच्या नाय्यहक्कांसाठी आम्ही त्याच्या सोबत ठामपणे लढणार आहोत.
उद्धव ठाकरे म्हणाले, “संकटांना सामोरे जाण्याची हिंमत आपल्या प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आहे. हिच हिंमत सरकारच्या अन्याय आणि दगाबाजीला पुरून उरेल. आता मागे हटायचं नाही; निर्धाराने पुढे जाऊन लढायचं आहे!”
या सभेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.

