
मुंबई :
माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे होणार आहे.
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. निवडणुकांपूर्वी पक्ष संघटनेची मजबुती, कार्यकर्त्यांची तयारी, मतदारसंघातील स्थिती आणि प्रचार धोरण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल.
याशिवाय, पक्ष नेतृत्वाच्या सूचनेनुसार अन्य काही महत्त्वपूर्ण विषयांवरही विचारविनिमय होणार असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.
या बैठकीस केंद्रीय व राज्य कार्यकारिणीचे सदस्य, विभागीय अध्यक्ष व सरचिटणीस, जिल्हा अध्यक्ष व सरचिटणीस तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांचे राज्य प्रमुख यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीदरम्यान राज्यातील सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक घडामोडींचाही आढावा घेण्यात येणार असून, आगामी काळातील पक्षाच्या कार्ययोजनांना गती देण्यावर भर दिला जाणार आहे.

