सिंधुदुर्ग : भाड्याच्या पैशांवरून सुरू झालेला वाद अखेर ‘अपहरण आणि मारहाण’ या बनावट प्रकरणापर्यंत पोहोचला, पण पोलिसांनी सखोल तपास करून या कथानकाचा खरा चेहरा उघड केला आहे.
सिद्धेश गावडे या युवकाने स्वतःचे अपहरण आणि मारहाण झाल्याची खोटी फिर्याद दाखल करून ‘फिल्मी ड्रामा’ रचला होता, मात्र पोलिसांच्या तपासात हा सगळा प्रकार बनाव असल्याचे समोर आले आहे.
युवकाने कुडाळमधील एका फ्लॅटचे भाडे न भरल्यामुळे अॅड. किशोर वरक यांनी विचारणा केल्याचा राग मनात धरून हे नाट्य रचले. त्याने पोलिसांत तक्रार देऊन अॅड. वरक आणि त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता.
तथापि, बांदा आणि निवती पोलिसांच्या चौकशीत सत्य बाहेर आले — सिद्धेश गावड्याची फिर्याद ही पूर्णपणे खोटी आणि बनाव असल्याचे निष्पन्न झाले.


