उल्हानगर: आज उल्हानगर मधील गोधूमल सेठ कृष्णानी, प्रवीण कृष्णानी, विनोद कृष्णानी यांच्यासह कृष्णानी परिवाराने भाजपा परिवारात प्रवेश केला. त्यांच्यासह माजी महापौर विद्याताई विजय निर्मळे, विजय निर्मळे, चंदिगडच्या माजी नगरसेविका शुभांगीताई बेनवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यांचे भाजप मध्ये पक्षप्रवेश श्री रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजप महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांनी ‘कमळ’ हाती घेतले.
यावेळी भाजपा उल्हासनगर जिल्हा उपाध्यक्ष पदावर प्रवीण कृष्णानी यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा उल्हासनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

