Kokan: शिवसेना मालवण तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल वस्त, उपाध्यक्षपदी सिया धुरी तर सचिव पदी अविराज परब यांची नियुक्ती

0
80
शिवसेना मालवण ता. सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल वस्त, उप. सिया धुरी,सचिव अविराज परब
शिवसेना मालवण ता. सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल वस्त, उप. सिया धुरी,सचिव अविराज परब

आमदार वैभवजी नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या नियुक्त्या

प्रतिनिधी-पांडुशेठ साठम

मालवण: लीलांजली हॉल मालवण येथे आज आमदार मा वैभवजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व सरपंच व उपसरपंच यांची बैठक संपन्न झाली. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ लोकांना कसा मिळवून द्यावा, नागरिकांची छोटी मोठी कामे कशाप्रकारे मार्गी लावावीत याचे उत्तम मार्गदर्शन यावेळी आमदार महोदयांनी उपस्थितांना केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-दामिनी-निर्भया-पथकाची-पे/

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुक्यातील नवीन सरपंच उपसरपंच संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी रेवंडी सरपंच श्री अमोल वस्त, उपाध्यक्षपदी कोळंब गावच्या सरपंच सिया धुरी तर सचिव पदी पळसंबं उपसरपंच श्री अविराज परब यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार वैभवजी नाईक यांनी सर्व सरपंच व उपसरपंच यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व जनतेच्या कामासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाळ महाभोज, मंदार केणी, दीपा शिंदे, श्वेता सावंत, अरुण लाड, प्रशांत सावंत, महेश जावकर, बाबी जोगी, नंदू गावडे, कमलाकर गावडे, शिल्पा खोत, बंडू सावंत, बंडू चव्हाण, संतोष घाडी, समीर लब्दे, तपस्वी मयेकर, सचिन पाटकर, विजय पालव, राजेश गावकर, संदीप हडकर, लीलाधर पराडकर, दिव्या धुरी, नेहा तोंडवळकर, नम्रता मुद्राळे, हर्षद पाटील, दिनेश परब, अनंत पोईपकर, संतोष पेडणेकर, रणजित परब, दिव्या बागवे, रंजना पडवळ, संतोष पडवळ, लता खोत, श्रद्धा वेंगुर्लेकर, रवींद्र साळकर, अजित लाड, देवेंद्र पुजारे, बाळकृष्ण सावंत, स्वप्नील पुजारे, शामा वाक्कर, संदीप आडवलकर, दुलाजी परब, निनाक्षी शिंदे, सन्मेश परब, राजू मेस्त्री, सचिन मालवणकर, किशोर कासले, भाऊ चव्हाण, अजिंक्य परब, विशाल धुरी, भगवान लुडबे, विजय नेमळेकर, बंड्या सरमळकर, यशवंत गावकर, दीपक किर्लोस्कर आदी शिवसेना सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

   
    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here